आलियाच्या आईच्या घरची 'ट्रिंग ट्रिंग' बंद, फोन बिल थकवलं|Bollywood Actress Alia Bhatt Mother Sony Razdan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sony Razdan news

आलियाच्या आईच्या घरची 'ट्रिंग ट्रिंग' बंद, फोन बिल थकवलं

Bollywood News: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही नेहमीच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हि़डिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे (Entertainment News) दिसून आले आहे. आता ती नव्हे तर तिची आई सोनी राजदान या चर्चेत आल्या आहेत. त्याचे कारण त्यांच्या घरचा बंद झालेला फोन. सोनी राजदान यांनी गेल्या महिन्यापासून फोन भरलेलं नाही. त्यामुळे संबंधित (Social Media news) कंपनीनं त्यांच्या घरचा फोन बंद केला आहे. ती लाईन कट केलेली आहे. बऱ्याचदा सर्वसामान्य माणसं ही लाईटबिल, फोनबिल भरत नाही अशी ओरड केली जाते. मात्र ती अनाठायी असते. असं दिसून आलं आहे.

यासगळ्यात आलियाच्या आईनं संबंधित कंपनीला दोषी धरले आहे. मी बिल भरलं आहे मात्र त्या कंपनीची माणसं अजुनही फोन सुरु करत नसल्याचे त्यांनी म्हटले (bollywood celebrity) आहे. मला त्या कंपनीनं खूप त्रास, दिला आहे. अजुनही माझ्या तक्रारीची नोदं काही घेतली गेली नाही. असं आलियाच्या आईनं म्हटलं आहे. आपल्याला देखील अनेकदा फोन बिल भरल्यानंतर टेलिफोन ऑफिसमध्ये जावं लागलं असेल. त्याच प्रमाणे अनेक सेलिब्रेटींना देखील तसाच त्रास झाल्याचे दिसून आले आहे.

सोनी राजदान यांच्या घरातील ट्रिंग ट्रिंग आता थांबली आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यासंबंधी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आपण ज्या कंपनीचे फोन वापरतो त्यांच्याकडून देण्यात येणारी सेवा ही खूपच मनस्ताप देणारी असल्याचे सोनी राजदान यांनी म्हटलं आहे. सोनी राजदान यांनी त्या व्टिटमध्ये म्हटलं आहे की, मी त्या कंपनीच्या बाबत फार दुखी आहे. त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही.

हेही वाचा: Viral Memes: 'ज्यांच्या हिंदूत्वात ED, CBI त्यांच्याबरोबर जाणार आम्ही!'

गेल्या 1 ते 24 मे पर्यत माझा फोन काम करत नव्हता. तो कुणी उचलतही नव्हतं. मी दहा मेल देखील केले, त्याला देखील कुणी उत्तर देत नव्हतं. शेवटी दहा मे ला मी पुन्हा मेल केला. त्यावर त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले. पूर्ण एक महिन्याचे पैसे घेतले. त्यामुळे मला आणखी राग आला आहे. अशाप्रकारे त्रास देऊन आपण पुन्हा त्याच व्यक्तीला स्थान देतो. हे माझ्यालेखी क्लेशकारक आहे. असे सोनी राजदान यांनी म्हटलं आहे. यावेळी सोनी राजदान यांनी काही स्क्रिन शॉट्स देखील शेयर केले आहेत.

हेही वाचा: Alia Bhatt Ranbir Kapoor चे आगामी चित्रपट, पाहा फोटो

Web Title: Bollywood Actress Alia Bhatt Mother Sony Razdan Telephone Service News Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top