Alia Bhatt pregnancy: तर मग आलियानं डीपी का बदलला? नक्की मामला काय?| Alia Bhatt Pregnancy photo trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt Pregnancy News

Alia Bhatt Pregnancy: तर मग आलियानं डीपी का बदलला? नक्की मामला काय?

Bollywood Actress Alia bhatt: बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं रणबीर आणि आलिया यांच्या गोड बातमीनं काल सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत होता. आता मात्र आलियाला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली (ranbir kapoor) आहे. आलियानं हॉस्पिटलमधील फोटो शेयर करुन प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते. आमचं बाळ लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे असं ती त्या पोस्टमध्ये म्हटली होती. त्यानंतर या जोडप्यावर कमेंटसचा वर्षाव सुरु झाला. नुकतचं आलिया - रणबीरचं लग्न झालं त्यानंतर आलियानं शेयर केलेल्या त्या पोस्टला नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. (Alia Bhatt Pregnancy News)

आता आलियाच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. आलिया नक्की (social media viral news) काय प्रकार आहे हे आम्हाला सांग असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. आलियानं तिची गोड बातमी दिल्यानंतर इंस्टावरुन डीपी बदलला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे. आलियाचा जो डीपी आहे तो रणबीरनं तिला लग्नाच्या वेळी प्रपोज केल्याचा फोटो आहे. त्या फोटोमध्ये आलियानं रणबीरला मिठी मारली होती. तर रणबीर हातात अंगठी घेऊन उभा असल्याचे दिसत होते. तो फोटो आता आलियाची सासूबाई नीतू कपूर यांनी शेयर करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नीतू कपूर यांनी तो फोटो शेयर करताना लिहिलं आहे की, देव तुमचं भलं करो....आलियानं देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नीतू कपूर यांनी शेयर केलेल्या त्या फोटोवरुन नेटकऱ्यांनी आलियाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, आणि तो आता पुन्हा का शेयर केला आहे. नक्की काय प्रकार आहे हे कळेल का अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Ranbir Kapoor news

Ranbir Kapoor news

हेही वाचा: Alia Bhatt Pregnancy:आलिया आगामी सिनेमांचे शूट थांबवणार? टीमची Update समोर

आलियाच्या आईनं सोनी राजदान यांनी देखील आफ्रिकेवरुन आलियाच्या त्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीर हे चर्चेत आले आहे. त्याचे मुख्य कारण आलियाची प्रेग्नंसी. अनेकांनी त्या फोटोला प्रमोशनल अॅक्टिव्हिटी असं म्हटलं आहे.

हेही वाचा: Alia Bhatt: आलियाच्या गुड न्यूजनंतर कंडोम कंपनीची अफलातून पोस्ट, म्हणाले..

Web Title: Bollywood Actress Alia Bhatt Pregnancy Photo Trolled By Users Changed Insta Profile

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top