फोटोसाठी पोझ देताना हुमानं विचारही केला नसेल, नेटकरी काय म्हणतील? | Bollywood actress Huma Qureshi trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood actress Huma Qureshi
फोटोसाठी पोझ देताना हुमानं विचारही केला नसेल, नेटकरी काय म्हणतील?

फोटोसाठी पोझ देताना हुमानं विचारही केला नसेल, नेटकरी काय म्हणतील?

बॉलीवूडची अभिनेत्री हुमा कुरेशी (Bollywood actress Huma Qureshi) ही सध्या तिच्या एका फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांनी (Trolled On social media) वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यावरुन तिला ट्रोलही केले गेले आहे. यामुळे फोटो टाकून मानसिक त्रास झालेल्या हुमाला आता आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. तिनंच आपल्याला फोटो टाकण्यापूर्वी थोडा वेळ विचार करण्याची गरज होती असे म्हटले आहे. सोशल मीडियावर (Photo viral On social media) हुमाच्या व्हायरल झालेल्या हुमाच्या त्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हुमा ही आता एका तमिळ चित्रपटामध्ये (Huma on tamil movie) दिसणार आहे. त्यामध्ये तिनं एक महत्वाची भूमिका साकारली आहे. वलिमे असे त्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट 13 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाच्या प्रभावामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्या चित्रपटामध्ये अजित कुमारनं मुख्य भूमिका साकारली आहे. गेल्या काही वर्षांपासून हुमानं आपल्या अदाकारीनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्सही आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह राहणारी सेलिब्रेटी आहे. यापूर्वी हुमानं एका वेबसीरिजमध्ये काम केलं होतं. त्यात तिच्या अभिनयाचं कौतूकही झालं होतं. त्यानंतर बऱ्याचकाळापासून तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही.

हेही वाचा: Video: 'लता दीदींचं' ते गाणं स्पर्धकानं गायल्यावर 'बादशहा' रडला!

त्याचं झालं असं की, सध्या हुमानं तिच्या इंस्टावरुन एक फोटो शेयर केला आहे. त्यामुळे तिच्या त्या फोटोंना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन आपण काय चूक केली आणि हे फोटो पोस्ट केले असा विचार हुमाला सतावतो आहे. असे फोटो शेयर करताना किमान एकदा विचार करण्याची गरज असल्याचे तिनं म्हटलं आहे.

हेही वाचा: पैशांसाठी चिमुकलीने खाल्ली मिर्ची? भावूक करणाऱ्या Video मागचं सत्य

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top