
Dharmaveer 2: सध्या मराठी मनोरंजन विश्वात अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहेत. ज्यात झिम्मा 2 ची चांगलीच चर्चा आहे. बॉलिवूडच्या सिनेमांना झिम्मा 2 चांगलीच टक्कर देत आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकांना धर्मवीर 2 सिनेमाची उत्सुकता लागली आहे.
2022 साली आलेल्या धर्मवीर चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. धर्मवीर सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली. या सिनेमात आनंद दिघेंची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.
आता धर्मवीर 2 ची घोषणा काही दिवसांपुर्वी झाली होती. आनंद दिघेंच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे.
निर्माते मंगेश देसाई यांनी धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याचे काही फोटो सोशल मिडियावर एक पोस्ट केले आहेत. ज्यात त्याने या चित्रपटाच्या शुटिंगचे काही खास क्षण शेयर करत चाहत्यांनी माहिती दिली आहे.
काही फोटो शेयर करत त्याने लिहिले की,
‘धर्मवीर’ च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा आणि '' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' उलगडून सांगणारा मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ''धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर आज चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.
लवकरच अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
यामुळे सज्ज व्हा, धर्मवीर पुन्हा येतायत आपल्या भेटीला...!!
आता प्रसाद ओक यांची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी पुन्हा एकदा आनंद दिघेंना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नेटकरी या पोस्टला कमेंट करत आहेत.
पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल!
"धर्मवीर २' मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." असं कॅप्शन देत धर्मवीर 2 ची घोषणा झाली. हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.