Nayanthara चा लग्नसोहळा लवकरच नेटफ्लिक्सवर, ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा

OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ९जून,२०२२ रोजी चेन्नईत पार पडलेल्या या ड्रीम वेडिंगची चमक आता घराघरात अनुभवता येणार आहे.
Nayanthara and Vignesh Shivan’s wedding documentary to stream soon on Netflix
Nayanthara and Vignesh Shivan’s wedding documentary to stream soon on NetflixInstagram

नयनतारा(Nayanthara) आणि विघ्नेश शिवनचं(Vighnesh Shivan) लग्न(Wedding) आता पूर्ण जग नेटफ्लिक्सवर (Netflix) पाहू शकणार आहे. ९जून,२०२२ रोजी चेन्नईत पार पडलेल्या या ड्रीम वेडिंगची चमक आता घराघरात अनुभवता येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या लग्नाला डॉक्टमेंट्रीच्या माध्यमातून दाखवल जाणार आहे. नयनतारा आणि विघ्नेशच्या लग्नात शाहरुख खानपासून ए.आर.रहमान आणि रजनीकांत देखील पाहुणे बनून गेले होते. या डॉक्युमेंट्रीत नयनताराच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तिचा नववधू बनण्याचा पूर्ण प्रवास अनुभवता येणार आहे.(Nayanthara and Vignesh Shivan’s wedding documentary to stream soon on Netflix)

Nayanthara and Vignesh Shivan’s wedding documentary to stream soon on Netflix
कसं करणार आलिया-रणबीर बाळाचं वेलकम? अभिनेत्याने पूर्ण लिस्टच वाचून दाखवली

डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शन गौतम वासुदेव मेनन करणार आहेत,तर या डॉक्युमेंट्रीची निर्मिती रावडी पिक्चर्स बॅनर अंतर्गत केली जाईल. अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवनने तामिळनाडूच्या महबलीपुरममधील एका रिसॉर्टमध्ये लग्नगाठ बांधली होती. अद्याप त्यांच्या लग्नसोहळ्यावर बनणाऱ्या डॉक्युमेंट्रीचे टायटल ठरलेले नाही, ना याच्या रिलीजची तारीख ठरवण्यात आली आहे. तसं पाहिलं तर आलिया-रणबीर,विकी-कतरिनाचा लग्नसोहळा ओटीटीवर रिलीज व्हायला हवा होता पण इथे नयनतारा बाजी मारुन गेली असं म्हणता येईल.

नेटफ्लिक्सने या डॉक्युमेंट्रीविषयी सांगताना एक निवेदन जारी केलं आहे की,''आम्ही अनस्क्रिप्टेड कॉन्टेंटला नेहमीच प्रथम महत्त्व दिलं आहे. आम्ही नेहमीच नवीन कल्पनांना,विषयांना पाठींबा दिला आहे. जे भारताबरोबरच जगातील इतर देशातील लोकांशीही कनेक्ट होण्याची ताकद ठेवतं''.

या डॉक्युमेंट्रीविषयी बोलताना नेटफ्लिक्स इंडियाच्या सिरीज हेड तान्या बामी म्हणाल्या आहेत की,''आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत नयनतारा सुपरस्टार म्हणून ओळखली गेली आहे. क्रिएटिव्ह पार्टनर,दिग्दर्शक गौतम वासुदेवन आणि राउडी पिक्चर्स मिळून या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनताराचा पूर्ण प्रवास दाखवणार आहोत. यामध्ये विघ्नेश शिवनसोबत लग्न होण्यापर्यंतचा सुंदर प्रवास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचं देखील त्या म्हणाल्या''.

मीडियाच्या वृत्तात दावा केला गेला होता की या कपलने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांना नोटिस जारी केलं गेलं होतं. तेव्हा म्हटलं गेलं होतं की डॉक्युमेंट्रीच्या मेकर्सनी ही नोटिस पाठवली होती,कारण यामुळे नेटिफ्लिक्ससोबत झालेलं डील अडचणीत येऊ शकत होतं.

आता यात दुमत नाही की नयनतारा-विघ्नेशच्या लग्नाची डॉक्युमेंट्री एखाद्या ओटीटी प्लॅफॉर्मवर दाखवलं जाणं ही एक नवी सुरुवात आहे. यामुळे आता भविष्यात एखाद्या दुसऱ्या सेलिब्रिटीचं लग्नही चाहत्यांना घरबसल्या पाहता येणार आणि आपल्या आवडत्या स्टार्सच्या लग्नाचे साक्षीदार झालो याचा आनंद काही औरच नाही का!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com