sai tamhankar
sai tamhankarEsakal

Sai Tamhankar: सईला मिळालाय उर्फीचा आशीर्वाद? नव्या फोटोेशुट मुळे झाली ट्रोल...

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. सईने तिच्या अभिनय प्रवास अनेक वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहेत.

तिनं हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, वेबसिरिज सगळ्या स्तरावर तिनं तिच्या अभिनयाची छाप सोडली. ती नेहमीच वेगळेपणासाठी ओळखली जाते.

तिनं मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहे. तिच्या मिमि या चित्रपटासाठी तिचं विषेश कौतुकही करण्यात आलं.

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते. सई नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

नेहमी काही ना काही पोस्ट करते. तिच्या चाहत्यांनाही तिच्याबद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता असतेच. ती तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते.

तिचे फोटो सोशल मिडियावर लगेच व्हायरल होतं. मात्र सध्या तिच्या इंस्टाग्रामवरील तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

sai tamhankar
Dasara Movie: टॉलिवूड पुन्हा बॉलिवूडला नडलं! साऊथच्या 'दसरा'मुळे अजयचा 'भोला' चिंता वाढली

नुकतचं सईनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सईने निळ्या रंगाचा लॉंग शिफॉन बॉडीकॉन गाऊन परिधान केला आहे.

तिच्या ड्रेसवर मोठं असं फुल दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिने अत्यंत बोल्ड पोज दिल्या आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मात्र यावेळी नेटकऱ्यांच लक्ष हे तिच्या ड्रेसवरील निळ्या फुलाकडेच गेलं आहे.या फुलाच्या नक्षीने साईच्या शरीराचा काही भाग झाला गेला आहे.

तिच्या या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सईच्या या लुकची सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

sai tamhankar
Prakash Raj Tweet: व्हायरल व्हिडिओप्रकरणी प्रकाश राज यांनी आमदाराची लाजच काढली! ट्विट व्हायरल...

मात्र सईचा हा हटके फोटोशुट चाहत्यांना काही खास आवडलेला नाही. हे त्या फोटोंना आलेल्या कमेंटवरुन दिसतय. नेटकऱ्यांनी तिची तुलना थेट उर्फी जावेदसोबत केली आहे. आता उर्फी जावेद बाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही.

ती तिच्या चित्र विचित्र फॅशनसाठी ओळखली जाते. आपल्या कल्पना शक्तीच्या पलिकडे तिची फॅशन असते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिम, काच सायकलची चेन, चिमटे इतकच नाही तर किवी च्या फळापासून बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे.

आता सईचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना उर्फीची आठवण झाली आहे.

sai tamhankar
Mrunal Thakur: मृणाल होतेय डिप्रेशनची बळी? सांगितली रडणाऱ्या फोटोमागची कहाणी..

एका युजर्सने तिला कमेंट करत लिहिलयं की, सई उर्फीकडून प्रेरित झालीयं.तर दुसऱ्यांने लिहिलयं की, आम्हाला मराठीतील उर्फी जावेद नकोय. तर काहींनी तिच्या लूकची प्रशंसाही केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com