
सलमानच्या बहिणीचं सोशल मीडियावर कौतुक,जाणून घ्या कारण
सलमानची बहिण अर्पिता खान शर्मा ही बॉलीवूडमधे अॅक्टीव नसली तरी तीचे बॉलीवूड कलाकारांशी जवळचे संबंध आहे.जेथे बॉलीवूड सेलिब्रिटी असतात अशा अनेक ठिकाणी अर्पिताची हजेरी असणं हे सिद्ध करतं की अर्पिता जवळ जवळ सर्वच बॉलीवूड कलाकारांच्या संपर्कात असून तीचे त्यांच्याशी असलेले बाँडिंगही चांगले आहे.(Bollywood Celibrities)अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यानं अर्पिताचे सेलिब्रेटींशी असलेले नाते तुम्हाला नुकत्याच पार पडलेल्या ईद पार्टीत बघायला मिळेल.
यावेळची ईद पार्टी सलमानच्या घरी नसून त्याची बहिण अर्पिताच्या घरी होती.या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना बोलण्यात आलं होतं.यातील काही अभिनेत्यांच्या हजेरीवरून सोशल मीडियात बरेच वाद आणि चर्चा उडाल्या होत्या.आश्चर्य म्हणजे कधीही सलमानच्या कुठल्याच चित्रपटात काम न केलेल्या आणि सलमानच्या कुठल्याच पार्टीत कधीही हजेरी न लावणाऱ्या दीपिकाने यावेळी ईद पार्टीला हजेरी लावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.हे तर सोडाच कंगनाच्या पार्टीतील एन्ट्रीने तर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते.कायम खानवर टिका करणारी कंगना पार्टीत गेलीच कशी असा जाबही अनेकांनी विचारला आहे.
कंगनाचं ,दीपिका आणि करणशी असलेले कोल्ड वार कोणापासून लपलेले नाहीच.अनेकदा यांच्यात ट्वीटर वारही घडून आलं आहे.अशात हे तीनही सेलिब्रेटी एका पार्टीमध्ये एकत्र हजेरी लावणं सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का देणारं होतं.तरी हे अर्पिताच्या घरी पार्टी असल्या कारणानं ते शक्य झालं असे अनेकांचे म्हणणे पडले.त्यामुळे अर्पिताचे सोशल मीडियावर कौतुक चाललेले दिसते.आणि अर्पिताचे सर्वांशी चांगले संबंध असल्याचेही पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Web Title: Salman Khans Sister Arpita Khan Sharma Appreciate By Fans For Her Bonding With
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..