'राधिका ते फोटो डिलीट करुन टाक'! चाहत्यांची विनंती | Tv entertainment Actress Radhika Madan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress radhika madan
'राधिका ते फोटो डिलीट करुन टाक'! चाहत्यांची विनंती

'राधिका ते फोटो डिलीट करुन टाक'! चाहत्यांची विनंती

Radhika Madan Bold Photo : छोट्य़ा पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या राधिका मदाननं (Actress radhika madan) बोल्ड अंदाजानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिनं पटाखा नावाच्या हिंदी चित्रपटामध्ये काम केलं होतं. चाहत्यांना तिची ती भूमिका आवडली होती. मात्र आता राधिका तिच्या भलत्याच बोल्ड अंदाजानं (Bold Look) चर्चेत आली आहे. तिनं तिचे बिकीनीतील काही फोटो सोशल मीडियावर (Social Media Post) पोस्ट केले आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिला ते फोटो काढून टाकण्याची विनंती केली आहे. राधिका तुझे फोटो डिलिट कर असं त्यांनी सांगितलं आहे. राधिकानं यापूर्वी देखील अशाप्रकारचे फोटो पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

राधिकानं अंग्रेजी मिडियमध्ये (Radhika role Angreji medium) देखील भूमिका केली होती. त्यावेळी तिला प्रसिद्ध अभिनेते इरफान खान (Irfan Khan) यांच्यासोबत अभिनय करण्याची संधी मिळाली होती. सनी कौशल (Sunny Kaushal) सोबत तिचा शिद्दत हा चर्चेचा विषय झाला आहे. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या राधिकाच्या त्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरुन तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. काही वेळा राधिका तिच्या हटके डान्स सेन्समुळे देखील चर्चेत येते. तिच्या बोल्ड फोटोंनी नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

हेही वाचा: TRUTH Social - ट्रम्प यांचा स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

राधिकानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही बोल्ड फोटो शेयर केले आहे. ते तिचं बिकीनी फोटोशुट आहे. त्यामध्ये राधिका भलतीच बोल्ड दिसते आहे. तिनं एक प्रिंटेड श्रग परिधान केला आहे. यावेळी तिनं काही बोल्ड पोज देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिला त्या फोटोंवरुन चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट देखील दिल्या आहेत. मात्र काही चाहत्यांना राधिकाचा तो अंदाज आवडलेला नाही. त्यांनी तिला ते फोटो डिलिट करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा: Video: 'लता दीदींचं' ते गाणं स्पर्धकानं गायल्यावर 'बादशहा' रडला!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top