संजीदा आणि आमिरचा फॅन्सला धक्का! घटस्फोटानंतर चर्चेत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjeeda and aamir ali
संजीदा आणि आमिरचा फॅन्सला धक्का! घटस्फोटानंतर चर्चेत...

संजीदा आणि आमिरचा फॅन्सला धक्का! घटस्फोटानंतर चर्चेत...

टीव्ही जगतातील (tv entertainment) खूप कमी जोडप्यांना प्रेक्षकांचा भरभरून सपोर्ट मिळतो. नच बलिये ३ चे विजेते जोडपे संजीदा शेख (sanjeeda shaikh) आणि अमीर अली (amir ali) हे त्या मोजक्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. सुरुवातीपासूनच त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली .२००७ मध्ये त्यांनी एकत्रितपणे नच बलिये (Nach baliye) या प्रतियोगितेत सहभाग घेतला तिथूनच त्यांच्या फिल्मी कहानीला सुरुवात झाली. एकमेकांना समजून घेतल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतल्यामुळे फॅन्स मध्ये आनंदाची लाट पसरली. त्यांच्या फोटोज आणि व्हिडिओज वर त्याना भरभरून प्रेम त्यांच्या फॅन्सने दिले .

काही वर्षानंतर त्यांना सरोगसीद्वारे एक गोड़ मुलगी झाली. आयरा आणि संजिदाचे अनेक व्हिडिओज सोशिअल मीडिया वर व्हायरल झाले . लग्नाच्या तब्बल ८ वर्षांनंतर त्यांच्या घटस्फोटाने त्यांच्या फॅन्सला हादरवून टाकले आहे. संघर्षाच्या काळात त्यांनी एकमेकांची नेहमी साथ दिली आणि वेगळे झाल्यांनंतरही एकमेकांच्या प्रायव्हसी चा विचार करता त्यांनी याबाबतीत काहीही व्यक्तव्य केलेले नाही.

हेही वाचा: कंगना राणावत CM योगींच्या भेटीला! राजकारण की मनोरंजन? चर्चांना उधाण

हिंदुस्तान टाइम्स च्या रिपोर्ट अनुसार त्यांना वेगळे होऊन ९ महिने झाले आहेत. आणि ते आपापल्या व्यक्तिगत आयुष्यात पुढे सरसावले आहेत. त्यांच्या घटस्फोटाने फॅन्स दुखी असले तरी त्यांच्या निर्णयाचा आदर करून त्यात सहभागी होणेच योग्य. गेल्या काही दिवसांपासून हे जोडपं चर्चेत आलं आहे. त्यांच्या वेगळे होण्याच्या निर्णयानं फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रेटींनी अशाप्रकारे टोकाचं उचलेलं पाऊल त्यांना आवडलेलं नाही.

हेही वाचा: PM Modi Security Breach: जे झालं ते अतिशय लाजीरवाणं! कंगना बोललीच

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top