'चांगलं गोमांस कुठे मिळतं?';अग्निहोत्री म्हणाले, 'मला विचारा',व्हायरल व्हिडीओनं खळबळ Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri old video confessing as he eats beef goes viral amid brahmastra boycott

'चांगलं गोमांस कुठे मिळतं?';अग्निहोत्री म्हणाले, 'मला विचारा',व्हायरल व्हिडीओनं खळबळ

Vivek Agnihotri On Beef: अभिनेता रणबीर कपूर(ranbir Kapoor),आलिया भट्ट आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी मिळून एकदम जोरदार ब्रह्मास्त्रचे प्रमोशन करत आहेत. एकीकडे सिनेमाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे, तर दुसरीकडे ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करण्याच्या मागे लोक हात धुवून लागले आहेत. रणबीर कपूरचा गोमांस विषयी वादग्रस्त वक्तव्य केलेला जुना व्हिडीओ व्हायरल केला गेला आणि ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करण्यामागे हेच कारण अशी ओरडही केली गेली.

याच व्हिडीओमुळे उज्जैन येथे गेल्यावर रणबीर आणि आलियाला महाकाल बाबा मंदिरात दर्शनासाठीही जाऊ दिलं गेलं नाही. काही दिवस आधी काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील ब्रह्मास्त्रवर आपली प्रतिक्रिया दिली होती. यात त्यांनी भले टीका केली असेल तरी अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाची प्रशंसा देखील केली होती. आता त्यानंतर विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे,ज्या व्हिडीओत ते आपल्याला गोमांस आवडतं असं बोलताना दिसत आहेत.(Vivek Agnihotri old video confessing as he eats beef goes viral amid brahmastra boycott)

हेही वाचा: बॉयकॉट ट्रेन्डला ब्रह्मास्त्रनं दिलं भिरकावून, रिलीज आधीच नावावर केला मोठा रेकॉर्ड

सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. जो व्हिडीओ एका मुलाखती दरम्यानचा आहे. या व्हिडीओत अग्निहोत्री बोलताना दिसत आहेत की,''मी हे देखील लिहिलं आहे की,तुम्हाला सगळ्यात उत्तम गोमांस कुठे खायला मिळेल, मी तर खुप साऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत,मी हे आधी देखील खायचो आणि आताही खातो. माझ्या आयुष्यात काहीच बदललेलं नाही''. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ एडिटेड नाही,खरा आहे असा दावा ईसकाळ करत नाही. कदाचित तो एडिटेडही असेल. बातमीत जोडला आहे,आपल्याला तो पाहता येईल.

काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री यांनी अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाची प्रशंसा करताना त्याची खिल्ली देखील उडवली होती. ते म्हणाले होते,''ब्रह्मास्त्रचा अर्थ तरी यांना माहित आहे का? आता यानंतर हे अस्त्रवर्स विषयी बोलत आहेत,ते काय आहे? दिग्दर्शकाला ब्रह्मास्त्र बोलता देखील येत नाही. अयान चांगला दिग्दर्शक आहे यात वाद नाही. मी त्याचा 'वेक अप सीद' आणि त्यानंतरचा 'ये जवानी है दिवानी' दोन्ही सिनेमे पाहिलेयत, मला ते आवडले होते. हा सिनेमा देखील चांगलाच असेल अशी आशा आहे''. याच मुलाखतीत अग्निहोत्री पुढे म्हणाले की,''मला तशीही त्याची काळजी वाटते,जशी एका आईला आपल्या मुलांची असते तशी''.

हेही वाचा: Video: योगा व्हिडीओत असं काय दिसलं की करिना कपूर होतेय ट्रोल,लोक म्हणू लागलेयत..

इथे थोडं संदर्भ लागण्यासाठी सांगतो की, २०११ मध्ये रणबीर कपूरने आपल्या 'रॉकस्टार' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान म्हटलं होतं की त्याला गोमांस खाणं आवडतं. तो म्हणाला होता की,''माझं कुटुंब पेशावरमधून आहे,त्यामुळे पेशावर खाणं आम्हाला आवडतं. मी मटण,पाया आणि गोमांस आवडीनं खातो. गोमांस मला सगळ्यात जास्त आवडतं''. नेमकं ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करणं सुरू झालं आणि रणबीरचा हा जुना व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर तर रणबीर आणि ब्रह्मास्त्रच्या मागे ट्रोलर्स हात धुवून लागले. आता अग्निहोत्रींचे काय होणार देवच जाणे.

Web Title: Vivek Agnihotri Old Video Confessing As He Eats Beef Goes Viral Amid Brahmastra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..