हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिआ वूल्फ मधून सुंदर खेळाची अनुभूती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

नाटकात तत्कालीन परिस्थितीतील उथळ जीवनशैली असणारी विक्षिप्त पात्रे भेटतात. मार्था आणि जॉर्ज हे दाम्पत्य पार्टी करून घरी आले आहे. मध्यरात्रीची वेळ असतानाच घरी पाहुणे येणार असल्याचे मार्था जॉर्जला सांगते. जॉर्ज अस्वस्थ होतो. जॉर्ज आणि मार्था म्हणजे दोन टोकं.

कोल्हापूर - दोन महायुद्धांनंतर साठच्या दशकातील सामाजिक व्यवस्था, कौटुंबिक नातेसंबंध, नीतिमूल्यांचा ऱ्हास या साऱ्या पार्श्‍वभूमीवर व्हर्जिनिआ वूल्फ यांच्या कादंबऱ्या गाजल्या. मात्र, या उद्‌ध्वस्त करणाऱ्या वास्तवातूनही मार्ग काढता येतो, असा आशावाद जागवणारं अमेरिकन नाटककार एडवर्ड एल्बी यांचं ‘हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिआ वूल्फ’ हे नाटक. वर्धन कामत यांनी हे नाटक अनुवादित केले आहे. इचलकरंजीच्या रंगयात्रा संस्थेने या नाटकाचा देखणा प्रयोग सादर करताना एका सुंदर खेळाची अनुभूती दिली. 

नाटकात तत्कालीन परिस्थितीतील उथळ जीवनशैली असणारी विक्षिप्त पात्रे भेटतात. मार्था आणि जॉर्ज हे दाम्पत्य पार्टी करून घरी आले आहे. मध्यरात्रीची वेळ असतानाच घरी पाहुणे येणार असल्याचे मार्था जॉर्जला सांगते. जॉर्ज अस्वस्थ होतो. जॉर्ज आणि मार्था म्हणजे दोन टोकं. मार्था जॉर्जचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसते. घरी आलेल्या पाहुण्यांसमोरही ती तशीच वागते आणि त्याचवेळी मग मध्यरात्रीच्या साक्षीनेच सुरू होतात विविध खेळ. या खेळांतून मग उलगडत जातात एकमेकांतील दोष, जगण्यातील यश-अपयश आणि एकूणच अस्वस्थ करणारा हा सारा खेळ. मुळात इंग्रजी नाटक. त्यातही एक उत्तम संहिता आणि तत्कालीन काळात घेऊन जाताना नेपथ्यासह सर्वच तांत्रिक बाजूंचा मेळ महत्त्वाचा होता. या सर्वच पातळ्यांवर ‘रंगयात्रा’च्या टीमनं नक्कीच चांगला अनुभव दिला. 

हा प्रयोग स्पर्धेत आणण्यामागची भावना कोणती ?

काही प्रसंगांतील भडक शब्दप्रयोग आणि कृती यांना आशयाला धक्का न पोचवता सौम्य स्वरूप दिले. नाटकाचा विषय समजून घेताना जितके कष्ट पडले, तितकीच जबाबदारीची जाणीवही वाढली. मात्र, अशा नाटकांचे प्रयोग आपल्याकडे व्हायला हवेत. नव्या पिढीला रंगभूमीवरील असे विविध प्रवाह समजायला हवेत, हीच हा प्रयोग स्पर्धेत आणण्यामागची भावना होती, असे दिग्दर्शक अनिरुद्ध दांडेकर सांगतात. 

पात्र परिचय -  

अनिरुद्ध दांडेकर (जॉर्ज), कादंबरी माळी (मार्था), पराग फडके (निक), संजना खंजिरे (हनी).

  दिग्दर्शक : अनिरुद्ध दांडेकर
  नेपथ्य : प्रवीण लायकर
  पार्श्‍वसंगीत : महेश गवंडी
  वेशभूषा, रंगभूषा : कादंबरी माळी

राज्य नाट्य स्पर्धेच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा -

नातीगोती मध्ये उलघडले मतीमंद अन् त्यांच्या पालकांचे भावविश्व 

‘तुघलक’ नाटकाचा देखणा प्रयोग 

‘विच्छा माझी पुरी करा’ तून चंदगडची पोरं हुश्शारचा संदेश 

‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ अस्सल ग्रामीण बाजातील नाटक 

‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय या प्रश्नांचा वेध 

एका फक्कड प्रयोगाची अनुभूती नटरंगने दिली 

राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who's Afraid of Virginia Wolf drama present state drama competition kolhapur