"रॉ' चा अधिकारी, शास्त्रज्ञ असल्याचे भासवून 25 जणांना याने घातला अडीच कोटींचा गंडा

मनोज साखरे
Saturday, 11 January 2020

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित पानसरे याचा नाशिकमध्ये शोध घेत गुरुवारी (ता. दहा) रात्री अटक केली. त्याची झडती घेतली असता पंतप्रधान कार्यालय, रॉ तसेच आयपीएससंबंधित ओळखपत्रे आढळली.

औरंगाबाद - स्वत:ची सायन्स कुडोस नावाची संस्था व आपण शास्त्रज्ञ असल्याची थाप मारून सुमारे पंचवीस जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित भामट्याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुरुवारी (ता. दहा) करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अभिजित पानसरे (रा. नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. आयपीएस व रॉ अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्रही त्याच्याकडे असल्याचे समोर आले आहे. अभिजित पानसरे नवीन व्यक्तींशी ओळख करून त्यांना आपण शास्त्रज्ञ असल्याची व आपली सायन्स कुडोस ही संस्था असल्याचे सांगत होता. तसेच तो दर्जेदार इंग्रजी बोलत होता.

तो उच्चविद्वत्ताधारक असल्याची छाप पडत होती. याप्रकरणी वास्तुविशारद शरद किसनराव गवळी यांची एका व्यक्तीमार्फत 2016 ला अभिजित पानसरेशी ओळख झाली. त्यावेळी पानसरे याने आपण रॉचे अधिकारी असून नासाच्या वतीने आपल्या मे. सायन्स कुडोस या संस्थेला न्यूक्‍लीअर रिऍक्‍टर तयार करण्याचे कंत्राट मिळाले, असे सांगितले.

परंतु प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैसे कमी पडत असून यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा देईल, अशी थाप त्याने मारली. त्यासाठी पानसरेने गवळी यांना नासाची तयार करण्यात आलेली बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखविले. यावर गवळी यांचा विश्‍वास बसला. त्यावेळी पानसरे याच्यासोबत दोन सहकारीही होत्या. शरद गवळी यांच्याकडून पंधरा लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी घेतले. त्यानंतर पानसरेने त्यांना परतावा देण्यास टाळाटाळ केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गवळी यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर अभिजित पानसरे, नितीन रायभान भवर (रा. सिडको) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध सिडको ठाण्यात फसवणूक व ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान, या संशयितांनी आणखी पंचवीस जणांची फसवणूक केल्याची माहितीही समोर आली असून, हा आकडा अडीच कोटींपर्यंत गेल्याचेही सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा -  Video : अशी निघाली साहित्याची उस्मानाबादेत ग्रंथदिंडी

त्याच्याकडे तपास यंत्रणेचेही ओळखपत्र 

गुन्हा नोंदविल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित पानसरे याचा नाशिकमध्ये शोध घेत गुरुवारी (ता. दहा) रात्री अटक केली. त्याची झडती घेतली असता पंतप्रधान कार्यालय, रॉ तसेच आयपीएससंबंधित ओळखपत्रे आढळली. ही कारवाई निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, गोकुळ वाघ, सुनील फेपाळे, मनोज उईके, बाळासाहेब आंधळे, नितीन घोडके, जयश्री फुके यांनी केली. 

हेही वाचा -

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणीसाहित्य

संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर

संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे चांदीचे पदकाने प्रदान करणार
Video : साहित्य संमेलनातच आढळली पायरटेड पुस्तके  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "RAW officials, pretending to be scientists, have 25 people worth half a crore