विकासकामांच्या पाहणीसाठी गृहराज्यमंत्री दुचाकीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

अकोला: राज्याचे नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज (मंगळवार) सकाळी अकोल्यात दुचाकीवर फिरून विकासकामांची पाहणी केली. यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्यासह ठेकेदारांचीही कानउघाडणी केली.

अकोल्यात सध्या मोठया प्रमाणात विकास कामे सुरू असून, या कामांचा दर्जा चांगला राहावा व सर्व कामे वेळेत पुर्ण व्हावीत म्हणून पालकमंत्र्यांनी यापूर्वीही अनेकदा निर्देश दिले. या निर्देशांची अमंजबाजवणी कशी सुरू आहे, यासोबत काही कामांबाबत नागरीकांनी केलेल्या तक्रारीमधील वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी पालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सकाळी दहा वाजेपासुनच दुचाकीने पाहणी सुरू केली. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारी १५ कोटीचे सांस्कृतिक भवनाच्या कामांवर कुठलाही फलक नसल्यामुळे कामाचा कालवधी, निधी, कधी पुर्ण होणार, ठेकदार कोण याबाबत सामान्य नागरीकांना माहिती कशी मिळणार, अशी विचारणा करून त्यांनी अधिकार्यांची कानउघाडणी केली. पुढील दोन महिन्यात हे भवन पुर्णत्वास येणे अपेक्षीत होते. प्रत्यक्षात मात्र कामाची संथ गती पाहून पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत सर्व यंत्रणांना धारेवर धरले. असाच प्रकार अशोक वाटीका ते सरकारी बगीच्या कार्यालयाच्या पर्यंतच्या रस्त्याबाबत सुरू आहे. कामाच दर्जा व संथ गतीबद्दल पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना धारेवर धरले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: akola news dr ranjeet patil two-wheeler cheaking the development work