‘हायवा’चोरांच्या आंतरराज्य टोळीला बेड्या, एका ट्रकमागे कमवायचे दीड लाख रुपये

Crime1
Crime1

औरंगाबाद : आंतरराज्य ट्रक चोरांना औरंगाबादेत ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत तब्बल अकरा संशयितांचा समावेश होता. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेल्या दोन सहायक टोळ्या असून चोरीच्या एका ट्रकमागे एका टोळीला एक ते दीड लाख रुपये मिळत होते, अशी माहितीही तपासातून पुढे आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, परमेश्वर ऊर्फ हवा पिता सखाराम वाघ (वय २७, रा. वानखेडे नगर, एन-१३ हडको), सोमीनाथ ऊर्फ सोन्या पिता सुरेश घोडके (वय २८, रा. पिंप्री राजा ता. जि. औरंगाबाद), संतोष ऊर्फ बकासुर पिता ज्ञानेश्वर थोरात (वय २७, रा. वाघलगाव ता.फुलंब्री, ह. मु. जयभवानी नगर), विजय जगन्नाथ धुळे (वय २०, रा. चित्तेपिंपळगाव ता. जि. औरंगाबाद) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित दिवसा हायवा ट्रक लावायची जागा पाहून रात्रीच्या वेळी तो ट्रक चोरुन परमेश्वर वाघचा मित्र जीवन माणिक कराड (वय २८, रा. पिराचीवाडी, ता. केज जि. बीड) याच्या मदतीने इतर जिल्ह्यात व परराज्यात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी जीवन कराड याची चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र सचिन सुभाष बर्ड (वय ३०, रा. हिवरशिंगा ता शिरुर कासार जि. बीड), गणपत परमेश्वर जायभाय (वय ४५, रा. महाकाल, अंकुशनगर कारखाना ता. अंबड जि. जालना), ज्ञानेश्वर सर्जेराव दहीफळे (वय ३०, रा. पिठलवाडा, ता. पाथर्डी जि. नगर), राजेंट शंकर देवकर (वय ४०, रा. चंदननगर पुणे), सोपान प्रभाकर मार, (वय २५, रा. ता. शिरुर कासार जि. बीड), राहुल श्रीमंत दलेकर (२६, रा. नरोटेवाडी जि. सोलापुर) यांना हायवा ट्रक दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांनाही हायवा ट्रकसह ताब्यात घेतले.

हायवा चोरीप्रकरणी रमजान शेर महंमद चारनिया (वय ६५, रा. महावीर कॉम्पलेक्स आकाशवाणी) यांनी चोरीची तक्रार दिली होती. त्यांचाही हायवा ट्रक ३१ डिसेंबरला एकोड पाचोड रोडवर आपदगांव शिवारातून चोराने लांबविला होता. टोळीकडून तीन हायवा ट्रक, तीन कार, दोन दुचाकी, मोबाईल असा एकुण एक कोटी तीन लाख वीस हजारांचा मुद्येमाल पोलिसांनी हस्तगत केला. संशयितांना चिकलठाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत सहायक फौजदार वसंत लटपटे आदींनी केली.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

एका ट्रकमागे मिळायचे दीड लाख रुपये रूपये
टोळी दिवसा हायवा ट्रक कोठे उभी राहतात ते हेरून रात्री चारचाकी वाहनाने हायवा ट्रकजवळ जात होते. ट्रक विनाचावीने वायरींग तोडून चालू करीत जीवन कराड याला नेऊन देत होते. संशयितांना एका ट्रकमागे एक ते दीड लाख रुपये मिळत होते. ते पैसे सर्वजण वाटून घेत होते. टोळीने चिकलठाणा हद्दीतुन चोरलेल्या चार हायवा चोरल्याची त्यांनी कबुली दिल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com