'स्विकृत'साठी क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीस प्राधान्य द्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

शहरातील क्रीडा संस्कृती लोप पावत चालली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रगती झपाट्याने होऊ लागले आहे. शहरात नसलेल्या भौतिक सुविधा, खेळाची मैदाने हे एक कारण असले तरी मनपात स्वतंत्र क्रीडा विभाग असतांना शहरातील खेळाडूंसाठी मात्र फारसे काही केले जात नाही. जर या क्षेत्राचा प्रतिनिधी सभागृहात असेल तर उणिवा दुर होऊ शकतात. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील तज्ञाची नियुक्ती करावी.

- मंगल पांडे, अध्यक्ष जिल्हा ऑलिम्पिक संघटना, परभणी.

ऑलिम्पिक संघटनेने केली मागणी

परभणीः परभणी जिल्हा ऑलिम्पिक संघटनेने महानगरपालिकेत स्विकृत सदस्यांची निवड करतांना क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीस प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. मनपातील सर्वच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेनेतील नेतेमंडळी ही क्रीडाप्रेमी, खेळांचे आश्रयदाते म्हणून ओळखले जातात. ते शहरातील क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी अशा क्रीडा क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची निवड करतील की आपली राजकीय समिकरणे जुळवतील हे आगामी काळात दिसून येणार आहे.

राज्यसभा, विधान परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी व्यतिरीक्त कला, क्री़डा, साहित्य व अन्य क्षेत्रातील व्यक्तीची स्विकृत सदस्य म्हणून नियुक्ती करावी, असे संकेत आहेत. परंतु ते पाळलेच जातात, असे नाही. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या काही वर्षापासून केवळ राजकीय समिकरणे, जाती-पातीची समिकरणे जुळविण्यासाठीच या जागांचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील समस्या, प्रश्न, अडचणी मांडण्यासाठी सभागृहातच कुणी नसल्यामुळे व अन्य लोकप्रतिनिधींना त्यामध्ये स्वारस्य नसल्यामुळे त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे, ही वस्तुस्थिती आहे.

परभणी महानगरपालिका नुकतीच गठीत झाली असून, स्विकृत सदस्य निवडीची प्रक्रिया अद्याप सुरु झाली नाही. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक संघटनेने ही मागणी केली आहे. महानगरपालिकेत सत्तेवर आलेल्या काँग्रेसपक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर हे स्वतः खेळाडू आहेत. तसेच ते कबड्डी सारख्या महत्वाच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष तर आहेतच, राज्य संघटनेवर देखील ते सक्रीय आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी हे क्रीडाप्रेमी ओळखले जातात. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून ते राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करतात. भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे हे स्वतः खेळाडू तर आहेतच व तसेच अनेक जिल्हा खेळ संघटनांचे ते अध्यक्ष आहेत. त्याच बरोबर खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील हे खेळाडू, क्रीडाप्रेमी असून अनेक खेळ संघटना ते चालवतात. श्री. वरपुडकर, भरोसे, श्री. जाधव यांच्या पाठोपाठ राजकारणाची सुरवातच मुळात खेळापासून झाली आहे तर डॉ. पाटील हे देखील खेळ संघटनांशी निगडीत आहेत. नुकतेच त्यांनी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यामुळे निश्चितच ते स्विकृत सदस्य म्हणून क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देतील, अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्राला आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
ट्विटर, सोशल मीडीयावर आगपाखड करत सोनूचा 'अलविदा'

दिव्यांगांना मिळणार आता ‘युनिक कार्ड’
महिला वाहकांस छेडछाड करीत पळविले 28 हजार रूपये​
सियाचीन भागात जेट पाठविले: पाकचा दावा​
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

स्वतःला घडवण्याच्या वृत्तीतून तरुणाची दमदार वाटचाल
"समृद्धी नाही, हा तर बरबादी महामार्ग'
पाकमध्ये अडकलेली महिला भारतात परतणार...
आज शाहिरांना रडावे लागतेय: बाबासाहेब पुरंदरे
सेक्‍स रॅकेट चालवित असल्याच्या संशयावरून महिलेला अटक

Web Title: parbhani news sport person Priority for Accepted members