Corona Effect : लातूरातील स्कूल बसचालकांवर आली ही वेळ..! वाचा त्याने अखेर केले तरी काय... 

school bus chalak.jpg
school bus chalak.jpg

लातूर : कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल बसचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लहान मुलांना दररोज घर ते शाळा आणि शाळा ते घर अशी वाहतूक केल्यानंतरच हातात थोडे पैसे पडतात. त्यावरच या स्कूल बसचालक व त्यांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह होतो. पण सध्या स्कूल बसची चाके बंद आहेत. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

त्यामुळे अशा चालकांना आता इतर व्यवसाय शोधावे लागत आहेत. असाच येथील एका स्कूल बसचालकाने आता भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. बसमध्येच भाजी ठेवून ते विक्री करीत आहेत. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. बसचे स्टेअरिंग असणार्या हातात आता तराजूचा काटा दिसू लागला आहे.

कोरोनाने सर्वच घटकावर परिणाम केला आहे. रोजगार मिळण्यासाठी हातावर पोट असणारे लहान व्यवसायिक धडपड करीत आहेत. हातात गाडीची स्टेअरींग असलेला स्कूल बसचालकही यातून सुटलेला नाही. येथील बापुराव निरफळ यानी वीस वर्ष ॲटोरिक्षा चालवला. पण वय वाढत चालल्याने त्यांनी पाच वर्षापूर्वी फायनान्सकडून पैसे काढून स्कूल बस खरेदी केली. येथील दोन शाळेतील विद्यार्थ्याना घर ते शाळा व शाळा ते घर अशी वाहतूक सुरु केली. यातून मिळणाऱया पैशातून त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता.

पण कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. त्याचा परिणाम त्यांच्यावरही झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड होवून बसले. त्यामुळे त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला. बसमध्ये भाजीपाला ठेवून ते सकाळी बांधकाम भवन परिसरात भाजीची विक्री करतात. तसेच दिवसभर रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली उभारून ते भाजी विक्री करीत आहेत. यातून ते कुटुंबियाचा उदरनिर्वाह करीत आहेत.


कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल बस बंद ठेवावी लागली आहे. गाडीचा हप्ता, कर, विमा मोठा आहे. बस बंद राहिल्याने पैसा नाही. कुटुंबियाचा उदरनिर्वाह करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. यातून चार पैसे मिळत आहेत.
बापुराव निरफळ, स्कूल बसचालक.

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com