रक्ताच्या नातेवाईकांनी झिडकारले; अखेर मुस्लिम बांधवांनी केले तिचे अंत्यसंस्कार 

युवराज धोतरे 
Sunday, 2 August 2020

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समाजात पसरत असलेल्या मृत्यूची दहशतीमुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र नैसर्गिक मृत्यू होऊन सुद्धा नातेवाईक येत नसल्याने सध्या समाजात काय परिस्थिती निर्माण झाली आहे याची जाणीव होते. हिंदू धर्मातील या घटस्फोटित महिलेवर अखेर मुस्लिम समाजाच्या स्वयंसेवकांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

उदगीर (लातूर) : शहरातील एका महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला. ही महीला घटस्फोटीत असल्याने नातेवाईकांचे पूर्वीपासून दुर्लक्ष...मृत्यू झाल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला. या संशयाने कोणताही नातेवाईक अंत्यविधी साठी पुढे आला नसल्याने शहरात बेघर निवारा केंद्र चालवणाऱ्या `सलात' {रोटी कपडा बँक) या संस्थेने पुढाकार घेऊन या महिलेवर अंत्यसंस्कार केले.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पेठ दरवाजा भागात एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन राहत होती. दहा वर्षापूर्वी पतीने तिला सोडून दिले होते. या महिलेचा शनिवारी (ता.१) रोजी मृत्यू झाला. सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा या संशयाने या महिलेकडे कोणतेही नातेवाईक फिरकले नाहीत. या महिलेच्या वडिल व सासर्‍यांनी नगरपालिकेच्या वतीने सलात (रोटी कपडा मकान बँक) संस्थेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शहरी बेघर निवारा केंद्राकडे नातेवाईक नसल्याचे सांगीतले. तर या महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शहर पोलीस ठाण्याकडे रोटी कपडा मकान बँकेला अंत्यविधीसाठी परवानगी देण्याचा विनंती अर्ज केला होता. पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन रोटी कपडा मकान बँकेच्या कार्यकर्त्यांनी या घटस्फोटित मयत महिलेवर महिलेचे वडील व साखरे यांच्या उपस्थितीत हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समाजात पसरत असलेल्या मृत्यूची दहशतीमुळे सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र नैसर्गिक मृत्यू होऊन सुद्धा नातेवाईक येत नसल्याने सध्या समाजात काय परिस्थिती निर्माण झाली आहे याची जाणीव होते. हिंदू धर्मातील या घटस्फोटित महिलेवर अखेर मुस्लिम समाजाच्या स्वयंसेवकांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

या अंत्यविधीसाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रोटी कपडा मकान बँकेचे गोस शेख, खुर्शीद आलाम, समीर शेख, रहीम शेख, लडाफ दस्तगीर, महबूब मणियार, अर्जुमंद शाहीन यांनी घरातून प्रेत उचलून स्मशानभूमीत नेऊन विधिवत अंत्यसंस्कार केले.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

मन की बात मध्ये उल्लेख...
या रोटी कपडा मकान बँकेच्या अशा अनेक राष्ट्रीय सामाजिक कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमातून रोटी कपडा मकान बँकेच्या कार्याचा उल्लेख केला होता व या बँकेला शुभेच्छा दिल्या होत्या.

Edit-Pratap Awachar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She was cremated by Salat Foundation