
आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सायरन असणार आहे. तसेच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही.
मुंबई : कोरोना कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने आज जारी केली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर सायरन असणार आहे. तसेच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही.
कोविड-19 रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वायूचा पुरवठा सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 (2005 चा.53) चे कलम 38 चे उप कलम (1) आणि उपकलम (2) मधील खंड (एल) आणि साथ रोग अधिनियम- 19871897 चा 3) चे कलम 2 अन्वये यासाठी या वाहनांना रुग्णवाहिका चा दर्जा देण्यात आला आहे.
त्यानुसार आपत्ती काळात पुढील एक वर्षासाठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहीका समकक्ष वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येणार आहे. अशा वाहनांना केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 108 च्या उप नियम (7) तसेच नियम 119 च्या उप नियम (3) च्या तरतूदी लागू करण्यात येत आहे, असे गृह विभागाने काढलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.
या महत्त्वाच्या बातम्याही वाचा :
-- सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी FIR का दाखल केला नाही? अनिल देशमुखांनी केला 'मोठा' खुलासा
-- गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत म्हणत आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड कनेक्शनबाबत आशिष शेलार म्हणतात...
-- कंगना गेली 'मनाली'ला आणि शिवसेनेकडून कंगनाबद्दल आली 'मोठी' प्रतिक्रिया
-- मुंबईकरांनो! मोकळा श्वास घ्या, मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम
( संकलन - सुमित बागुल )
ambulance status for vehicles transporting oxygen state home department issued GR