

Mumbai High Tide Alert
ESakal
मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जोर लावल्यानंतर मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. यामुळे मुंबईकरांना पुन्हा उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत असून पाऊस पुन्हा कधी बरसणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यावर मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील चार दिवस समुद्राला भरती येणार असल्याचे बीएमसीने सांगितले आहे. ज्यामुळे सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.