esakal | सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केलं, ठाण्यातील 8 दुकाने झालीत सील
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केलं, ठाण्यातील 8 दुकाने झालीत सील

सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याबरोबरच लाॅकडाऊन नियमांचे उल्लंघन करून रात्री उशीरापर्यंत दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानांवर ठाणे महानगरपालिकेने कडक कारवाई केली आहे

सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केलं, ठाण्यातील 8 दुकाने झालीत सील

sakal_logo
By
सुमित बागुल

ठाणे : सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याबरोबरच लाॅकडाऊन नियमांचे उल्लंघन करून रात्री उशीरापर्यंत दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानांवर ठाणे महानगरपालिकेने कडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकूण आठ दुकाने सील करण्यात आली आहेत. महानगरपालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

नौपाडा प्रभाग समितीतंर्गत तलावपाळी आणि चिंतामणी चौक या परिसरात काही दुकाने रात्री सात नंतरही उघडी ठेवून लाॅकडाऊनच्या नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी महापालिका शर्मा यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने उप आयुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांनी सोमवारी संध्याकाळी अतिक्रमण पथकाच्या साहाय्याने  8 दुकानांवर कारवाई करून ती दुकाने सील केली. या दुकानांमध्ये पिझ्झा, सॅंडविचेस, कुल्फी, आयस्क्रीम आदी दुकानांचा समावेश आहे. 

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

-- आदित्य ठाकरेंचं उठणं-बसणं मुव्ही माफिया आणि सुशांतच्या खुन्यांसोबत, कंगनाने पहिल्यांदाच थेट नाव घेत केलं ट्विट

-- सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी FIR का दाखल केला नाही? अनिल देशमुखांनी केला 'मोठा' खुलासा

-- गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत म्हणत आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड कनेक्शनबाबत आशिष शेलार म्हणतात...

-- कंगना गेली 'मनाली'ला आणि शिवसेनेकडून कंगनाबद्दल आली 'मोठी' प्रतिक्रिया

-- मुंबईकरांनो! मोकळा श्वास घ्या, मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम

corona crisis for not following unlock rules eight shops are sealed in thane