मुंबई : ‘‘सुपाऱ्या देऊन बदनामीच्या कितीही मोहिमा चालवल्या तरी काही फरक पडणार नाही. काही पाखंडी लोकांना पुढे करून शिखंडी लोक त्याचा आधार घेत आहेत हे दुर्दैव आहे. गद्दार म्हणून भुई थोपटत बसा एक दिवस पक्षाचे दार बंद करावे लागेल, ’’असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावर चढवला. मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना निवडणूक निकालामुळे शहाणपण आलेले नसल्याचे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना चपराक लगावली.