प्लॅस्टिक बंदीनंतर कापडी पिशव्यांचा पर्याय

सुचिता करमरकर
गुरुवार, 29 जून 2017

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येत असल्याने आता महिलांकडून तयार केल्या जाणाय्‌ा कापडी पिशव्यांच्या पर्यायाचा विचार करावा, अशी विनंती स्व शक्ती या महिलांच्या संस्थेने केली आहे. आज (गुरुवार) या संस्थेच्या महिलांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांची यासंदर्भात भेट घेतली.

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येत असल्याने आता महिलांकडून तयार केल्या जाणाय्‌ा कापडी पिशव्यांच्या पर्यायाचा विचार करावा, अशी विनंती स्व शक्ती या महिलांच्या संस्थेने केली आहे. आज (गुरुवार) या संस्थेच्या महिलांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांची यासंदर्भात भेट घेतली.

साधना जोशी, डॉ भाग्यश्री मोघे, रेखा शिधोरे, भारती चाफेकर यांनी महापौरांना लेखी निवेदन देऊन कापडी पिशव्यांना प्राधान्य देण्याची विनंती केली. मागील एक वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून जुन्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करुन त्यांची विक्री केली जात आहे. ही एक पिशवी तयार करण्यासाठी दहा रुपयांचा खर्च होतो. त्यांची विक्री करताना ना नफा ना तोटा तत्वावर केली जाते. प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून या पिशव्या नागरिकांना उपलब्ध करु दिल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महापौर देवळेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याचा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. कापडी पिशव्यांचा वापस वाढवल्यास त्या पिशव्या महिला बचत गटांच्या माध्यमातूनही तयार करुन घेण्याचा विचारही त्यांनी मांडला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी
Web Title: kalyan news plastic bag ban