आगी पासून बचाव आणि प्रथमोपचारबाबात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (व्हिडिओ)

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई: जन हो ! आपल्या आजूबाजूला लागलेली आग आणि ज्वाळा पाहुन घाबरुन अथवा भितीने आगss आगss आग असे ओरडत धावत सुटू नका. आगीने वेढलेल्या व्यक्तिस समोरून वाचवायला जाऊ नका. पेटलेली व्यक्ती बचाव करणाऱ्याला मिठी मारू शकते. मग दोघेही भाजले जातात. घरात गॅस लिक झाला की इलेक्ट्रिक स्विच ऑन किंवा ऑफ़ करू नका, त्याने स्पार्क होऊन स्फोट होऊ शकतो. साधी आग, इलेक्ट्रिक फायर, केमिकल फायर, रेडियेशन फायर यापासून स्वतःचे आणि आजुबाजूच्या लोकांचे संरक्षण कसे कराल? आगीच्या धुरा पासून सर्वात जास्त मृत्यु गुदमरल्याने होतो म्हणून नाक व तोंड ओल्या रुमालाने झाकून बांधा आणि लहान मूलांसारखे रांगत रांगत सुरक्षित ठिकाणी जा.

मुंबई: जन हो ! आपल्या आजूबाजूला लागलेली आग आणि ज्वाळा पाहुन घाबरुन अथवा भितीने आगss आगss आग असे ओरडत धावत सुटू नका. आगीने वेढलेल्या व्यक्तिस समोरून वाचवायला जाऊ नका. पेटलेली व्यक्ती बचाव करणाऱ्याला मिठी मारू शकते. मग दोघेही भाजले जातात. घरात गॅस लिक झाला की इलेक्ट्रिक स्विच ऑन किंवा ऑफ़ करू नका, त्याने स्पार्क होऊन स्फोट होऊ शकतो. साधी आग, इलेक्ट्रिक फायर, केमिकल फायर, रेडियेशन फायर यापासून स्वतःचे आणि आजुबाजूच्या लोकांचे संरक्षण कसे कराल? आगीच्या धुरा पासून सर्वात जास्त मृत्यु गुदमरल्याने होतो म्हणून नाक व तोंड ओल्या रुमालाने झाकून बांधा आणि लहान मूलांसारखे रांगत रांगत सुरक्षित ठिकाणी जा. शक्यतो लिफ्टचा वापर टाळा, 100, 101, 102, 103 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून मदत मागा, असे विविध प्रश्न आणि त्यांची उत्तरे तज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांना संवादातून मिळत होती. आणि हा संवाद साधला जात होता दक्षिण मुंबईतील गिरणगाव म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या करीरोड येथील सहकार रात्रशाळा व नाईट ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यां समोर.

नॅशनल बर्न सेंटर (ऐरोली) या रुग्णालयातील डॉ. सुनील केसवानी (मेडिकल डायरेक्टर) आणि डॉ. नवीन वझरानी यांनी स्लाईड शो मार्फत विस्तृत माहिती आणि लेक्चर देत अग्नी सुरक्षा अभियानास प्रारंभ केला त्या कार्यक्रमाचे. घरात, कार्यालयात अथवा आपण आहोत त्या ठिकाणी आग लागू नये म्हणून घ्यायची खबरदारी, आग लागल्यास करावयाच्या तात्काळ उपाय योजना, प्रथमोपचार, आगीचे प्रकार आणि रुग्णाल्यात त्यांच्यावर होणारे उपचार व त्या साठी येणारा प्रचंड खर्च यां सर्व बाबींची माहिती स्लाईड शो मार्फत विद्यार्थ्यांना सविस्तर देण्यात आली. घरात आग लागल्यावरही हल्ली लोक सेल्फ़ी काढतात, रेल्वेच्या टपा वरून प्रवास करताना किंवा इमारती, डोंगराच्या कड्यावर धोकादायक स्थितीत उभे राहून सेल्फ़ी काढ़तात आणि जीव धोक्यात घालतात गमावतात. या KISS OF DEATH ला प्रतिबंध करा, अशा बऱ्याच केसेस आम्ही पहात आहोत, असे डॉ. नवीन वझरानी सांगत होते आणि उपस्थित विद्यार्थी गंभीरतेने श्रवण करीत होते.

मृत्यु नंतर त्वचा दान करा
आगीत भाजलेल्या व्यक्तीना त्वचा मिळाल्यास त्यांचे जीवन आनंदी होईल. मृत व्यक्तीची त्वचा अवघ्या 6 तासांत काढता येते आणि 5 वर्षे फ्रीजर मध्ये सुरक्षित राहते. गरजू रुग्ण ही त्वचा प्राप्त झाल्याने आपले उर्वरीत जीवन आनंदात जगू शकतो. त्वचा ही कागद आणि कापड़ी पातळा पेक्षाही मऊ आणि पातळ असते. त्वचा दान करा आणि पुण्य कमवा. असा संदेश डॉक्टर मधून-मधून देत होते. आपल्या घरात आग  लागल्यास आपला आणि कुटुंबियांचा जीव आधी वाचवा तात्काळ घरा बाहेर पडा. गॅस सिलिंडर आणि इलेक्ट्रिक मेन स्विच जाताना बंद करा. आपली मौल्यवान वस्तू काढण्यासाठी मुद्दाम होरोगिरी करीत आगीत जाऊ नका. आगीत भाजले की जीवास धोका उत्पन्न होतो. आगीत भाजले की दुखनार, जळजळणार त्यावर फक्त नळ अथवा मटक्याचे पाणी सोडा. बर्फ किंवा थंड पाणी वापरु नका. फक्त सोफ़्रामायसीन क्रीम लावा. हळद किंवा अन्य कसलाही वापर करू नका.

लिफ्टमध्ये अडकल्यास धुरा मुळे अवघ्या 10 मिनीटांत मृत्यु होतो. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी फक्त जिन्याचा वापर करा. घाबरुन जाऊ नका, तात्काळ संयमी आणि योग्य निर्णय घेत स्वतः सहित अन्य लोकांचा जीव वाचवा. इलेक्ट्रिक शार्ट सर्किट वर पाणी टाकू नका शॉक लागून मृत्यु होऊ शकतो. आग लागलेल्या जागेतुन स्वतःचा बचाव कसा करावा. त्याच्या चित्रफीती (स्लाइड शो) दाखविण्यात आल्या.
साफ़ चादर कपड़ा टाकुन रुग्णालयात तात्काळ न्यावे.

रेडियेशन बर्न न्युक्लीअर पॉवर ने लागलेल्या आगीत फायर ब्रिगेड आपले काम चोख बजावते त्यांना रस्ता मोकळा करुन द्यावा. वाहतूक सुरक्षित मार्गावर वळवावी. आग लागू नये म्हणून आपल्या घरा पासून सुरुवात व्हायला हवी. सावधानता बाळगने,विद्युत उपकरणांची चांगली देखभाल करणे असे उपाय योजने हाच आग रोखण्याचा सर्वोत्तम रामबाण उपाय आहे. कार्यक्रमानंतर कॉलेज तर्फे प्रिंसिपल राजेश तांदळे, प्रा. स्मिता पाटील, प्रा. सुमिता ठाकुर, प्रा. शरद गिरमकर, प्रा. चव्हाण, प्रा. परब यांच्यासह विद्यार्थ्यांनी डॉ. नवीन वझरानी आणि नॅशनल बर्न सेंटरचे आभार मानले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news Guidance to rescue students from the fire and first aid