एकवीरा देवीच्या मंदिराच्या कळसाची चोरी

एकवीरा देवी
एकवीरा देवी

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराला नव्याने बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

सोमवारी रात्री ही चोरी झाली आहे. कुलस्वामीनी एकविरा देवीच्या मंदिराला तीन वर्षांपूर्वी एका भाविकाने सोन्याचा कळस मंदिराला अर्पण केला होता. दोन दिवसांपूर्वी देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता. त्यानंतर मंगळवारी ही घटना उघडकीस आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

विशेष म्हणजे मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com