महिंद्रा अँड महिंद्राने 10 वर्षांत लावली 1.3 कोटी झाडे

पूनम कुलकर्णी
बुधवार, 5 जुलै 2017

सध्या महाराष्ट्रामध्ये 21 टक्के झाडे आहेत ती 5 वर्षात 33 टक्के करण्याची आमची योजना आहे. लोकांमध्ये सरकारच्या बाबतीत एकमत बनले आहे. सरकार दरवर्षी त्याच खड्यात झाडे लावते ती झाडे जगवू शकत नाही म्हणून आम्ही 2 वर्षे पूर्ण झालेली झाडे वृक्षारोपनासाठी लावत आहोत.

- मुख्यमंत्री

दादर : महिंद्रा अँड महिंद्राच्या वतीने 2 ऑक्टोबर 2007 ला सुरू झालेल्या वन महोत्सव या उपक्रमाअंतर्गत 10 लाख झाडे दरवर्षी लावली जातात. गेल्या 10 वर्षात 1 कोटी 30 लाख झाडे लावली गेली आहेत. त्यापैकी 75 टक्के झाडे अजून जिवंत सुस्थितीत आहेत, असे महिंद्राने राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमाविषयी बोलताना सीएसआर कौन्सिलचे चेअरमन राजीव दुबे यांनी सांगितले.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या वतीने वन महोत्सव 2017 या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सकाळी वरळी पोलिस कॅम्पच्या सर पोचखानवाला रोड येथील आद्य शंकराचार्य गार्डन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. तर वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील कार्यक्रमात उपस्थित राहिले.

ज्या प्रमाणे आपण व्यवसाय करतो तसेच वृक्षारोपनाचे आहे. महिंद्रा हरियली योजना आम्ही सुरू केली आणि ती सक्सेस झाली आहे असे ते म्हणाले. तर महिंद्रा ग्रुप चे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, मला आनंद होत आहे लाखो  झाडे आम्ही लावली आणि त्यामधील 20 लाख महाराष्ट्रात लावली गेली आहेत. झाडे फक्त लावली नाहीत तर ती जगवली देखील आहेत. महिंद्राच्या देशातील प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवला गेला आहे. व्यवसाय ज्या प्रमाणे वाढवण्यासाठी योजना कराव्या लागतात त्याच प्रमाणे वृक्षारोपण करून झाडे वाढवण्यासाठी देखील आशा विशेष योजना कराव्या लागतात . त्यामुळे आमचे हे वृक्षारोपण उपक्रम सक्सेस झाला आहे. आम्ही आमच्या बरोबर देशाचा पर्यावरणाचा कसा फायदा होईल यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे हा वृक्षारोपण उपक्रम आम्ही राबवू शकलो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमात बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "1 कोटी 30 लाख झाडे महिंद्रा ग्रुपने लावली ही गोष्ट कौतुकास्पद आहे. धन भौतिक सूख देते पण वन पर्यावरण सुख देते. महाराष्ट्राच्या ग्रीन हरियाली साठी महिंद्रा ग्रुप सारखे लोक साथ देतात ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे. सी एस आर मधून महिंद्रा दरवर्षी वृक्षारोपण करते नमामी चंद्रभागा या उपक्रमा अंतर्गत आम्ही देखील वृक्षारोपण करत आहोत. या उपक्रमात त्या विभागातील लोकांना  लोकांना फळ झाडे देत आहोत. त्याप्रमाणे महिंद्रा ने  आम्हाला पुढच्यावर्षी वृक्ष  देऊन मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो," असे मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 10 लाख झाडे दरवर्षी महिंद्रा ग्रुप कडून लावली जातात यंदा या पावसाळ्यात देखील त्यांच्या या उपक्रमाला प्रारंभ होत आहे महाराष्ट्र सरकारने वृक्षारोपण उपक्रमाला आता सुरुवात केली आहे. परंतु महिंद्रा ग्रुपने या उपक्रमाला 10 वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. महाराष्ट्राला नवीन ग्रीन कव्हर देण्यासाठी वन मंत्र्यांनी सुरू केलेल्या उपक्रमा अंतर्गत पुढच्या 5 वर्षात 50 कोटी झाडे लावणार आहोत. जलयुक्त शिवार योजनेचा महाराष्ट्र ला अत्यंत फायदा झाला आहे. दरवर्षी 5 हजार ट्रॅकर पाणी द्यावे लागायचे यंदा फक्त 500 ट्रॅकर पाणी द्यावे लागले आहे. यावर्षी 11 हजार गावे दुष्काळ मुक्त करत या ठिकाणचा पाण्या दुष्काळ संपावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असे यावेळी फडणवीस म्हणाले. कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी रुद्राक्षाचे झाड तर मुनगंटीवार यांनी नारळाचे झाड आद्य शंकर आचार्य गार्डन वरळी येथे लावले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news mahindra and mahindra tree plantation