मुंबईः शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबईः विजांच्या कडकाडाटासह सुरू झालेल्या पावसाने 29 जुलैची मुंबईकरांना आठवण करून दिली. शहरात 28.71 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 28.93 तर पश्‍चिम उपनगरात 25.93 मिलीमीटर इतका
पाऊस पडला.

शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरूच आहे. मात्र, उपनगरीय रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झालेला नाही. विलेपार्ले येथे रेल्वेच्या ट्रॅकवर झाड पडल्याने पश्‍चिम रेल्वेची सेवा काही विस्कळीत झाले होते. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला असून पश्‍चिम उपनगरातही जारदार पाऊस सुरू आहे. हार्बर रेल्वे पंधरा ते वीस मिनीटे उशाराने धावत असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.

आज (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजल्यापासून समुद्राला मोठी भरती असून, भरतीच्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईत पाणी भरण्याची धोका आहे. आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पालिकेची आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news rain in mumbai and navi mumbai