
मुंबई, ता. 24 : कोरोना सर्वेक्षणमुळे शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. यानंतर आत शिक्षकांची पुन्हा निवडणूकीचे बूथ लेवल ऑफिसर आणि बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आल्याने आता शिक्षक परिषदेने पुन्हा संताप व्यक्त केला आहे.
शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे बंद होणार असल्याची ग्वाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यामुळे अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांची सुटका होणार आहे. या सर्व अशैक्षणिक कामांच्या जबाबदाऱ्या टप्प्याटप्पयाने बंद होणार असे आश्वासनही दिले होते.
कोरोना काळात आता शाळा बंद असल्याने शिक्षकांवर अशैक्षणिक कामांची जबाबदारी लादण्यात आली आहे. मात्र अजूनही अशैक्षणिक कामे देणे सुरूच आहे. शिक्षण खात्याच्या परवानगी शिवाय अशी कामे देऊच नयेत अशी मागणी मुंबई शिक्षक परिषदेने केली असून ही कामे तात्काळ बंद करावीत अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
( संपादन - सुमित बागुल )
once again election duty given to teachers teachers organizations are unhappy
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.