Shirdi Loksabha: फडणवीसांनी दिले हे आश्वासन अन् आठवलेंनी सोडला शिर्डीचा हट्ट!

फडणवीस यांचे आश्वासन आणि शिर्डीची जागा आठवलेंनी सोडली | Fadnavis' assurance and Shirdi seat left by Athavale
ramdas athavle devnara fadanvis ekanth shinde
ramdas athavle devnara fadanvis ekanth shindesakal

Ramdas Athavle In Dombivali: शिर्डी लोकसभा मतदारसंघावर आरपीआय पक्षाकडून दावा करण्यात आला होता. मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटाने स्वतःकडे खेचल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज होते.(shirdi Loksabha )

त्यांची नाराजी दूर झाली का असे त्यांना विचारले असता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या बदल्यात दिलेले आश्वासन जाहीर करत ते आश्वासन पाळतील अशी आशा आहे. त्यामुळे आता अम्हीणाराज नसून ती जागा सोडली असल्याचे सांगितले. (devendra Fadanvis)

ramdas athavle devnara fadanvis ekanth shinde
Shirdi Loksabha: सदाशिव लोखंडेंच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल? मुख्यमंत्री लोखंडेंना दिले 'हे' आदेश

डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीयमंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाविषयी विचारणा केली. आठवले यांच्या आरपीआय पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता.

मात्र शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आठवले नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आमचा आग्रह होता. शिर्डीत उभ राहण्याची माझी इच्छा होती. 2009 मध्ये मी हरलो होतो. एखादी जागा मिळावी असा आमचा आग्रह होता.(rajyasabha election)

मात्र एकनाथ शिंदे यांची अडचण होती. देवेंद्र फडणीस यांनीही आग्रह केला होता त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते, त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. शिर्डी मध्ये सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी खासदार होते त्यामुळे प्रयत्न करूनही ती जागा सोडली नाही.

ramdas athavle devnara fadanvis ekanth shinde
Shirdi Loksabha: शिर्डी मतदारसंघात यंदा कोणती लाट? २००९पासून फडकतोय शिवसेनेचा झेंडा

आता देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ला माझी राज्यसभा संपते, त्यांनी मला पुन्हा राज्यसभेवर पाठवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्रीपद आहे, आता कॅबिनेट मंत्री पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात निवडणुकीनंतर विस्तार झाले की मंत्रिपद आणि एम एल सी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे . महामंडळात चेअरमन व दोन वेगवेगळी पदक यामध्ये आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल.(maharashtra news)

हे सर्व बोलणं आमचे मान्य केल्यामुळे आधी नाराजी आमच्यामध्ये होती आता नाही. आरपीआय महायुतीत आहे त्यांनी आमचा विचार केलाय. मात्र जागेची अडचण आहे असे आम्हाला सांगितले. शिर्डीच्या जागेसाठी आग्रही होतो. ती त्यांना सोडता आली नाही. मात्र बाकीचे आश्वासन त्यांनी दिलेले आहेत ते पाळतील अशी आम्हाला आशा आहे. मनसे महायुतीत आलेली नाही त्यामुळे त्यांना कुठली जागा सोडण्याचा निर्णय नाही असे ही आठवले म्हणाले.(loksabha election 2024)Shirdi Loksabha

ramdas athavle devnara fadanvis ekanth shinde
Shirdi Loksabha: भाऊसाहेब वाकचौरे की बबनराव घोलप? शिर्डीच्या तिकीटावरून मातोश्रीवर खडाजंगी.. उद्धव ठाकरेंसमोर पेच

सरकार आपल्या दारी कार्यक्रमात तीन पक्षाचे झेंडे दिसतात, आमचा झेंडा दिसत नाही. याबद्दल कार्यकर्त्यात नाराजी आहे. आणि त्यावर ती दुरुस्ती करून आरपीआय आणि मान दिला जाईल असं आश्वासन दिलेले आहे. दहा वर्षाच्या कालावधीत जी काम केलेली आहेत त्यामुळे महायुती सोबत राहण्याचा आम्ही निर्णय घेतले आहे.(why ramdas athavle supports are not happy)

आणि आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील. देशाचे संविधान कोणी बदलू शकत नाही आणि बदलणारे नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. तरी त्या मंत्रिमंडळात मी आहे. संविधानाला हात लावू देणार नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे.

तरुणांनी माझ्याबरोबर याला हवं मी व्हिजन बोलत चाललोय. ते एकट्याच्या ताकदिने येण अशक्य असेल तर मित्र पक्षाच्या सोबत गेलं पाहिजे.

सध्याच्या परिस्थितीत इंडिया आघाडी फक्त अफवा पसरवायचं काम करते समाजामध्ये. भारत जोडो यात्रा काढत असताना भारत तोडण्याचे काम करतात.

ramdas athavle devnara fadanvis ekanth shinde
Shirdi Loksabha: शिर्डीची जागा ठाकरे गटाकडेच! महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, संजय राऊत यांनी दिली माहिती

काँग्रेसच्या हातात इतके वर्षे सत्ता होती. तरी त्यांनी कुठली काम केली नाही. बाबासाहेबांची काम पूर्ण केली नाही यामुळे इंडिया आघाडी बरोबर जायचा प्रश्नच येत नव्हता. तरुणांना माझा आवाहन आहे की आपण शॉर्ट टर्म चा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करावा.

परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही. आज बीजेपी मध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले आहे. बीजेपी 1982 मध्ये दोन हजाराची होती ती 303 ची झालेली आहे. बीजेपीला सर्वांची मतं मिळत आहेत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.(maharashtra poitical news)

ramdas athavle devnara fadanvis ekanth shinde
Shirdi Rally: अमोल कोल्हेंना पाडण्याचा काहींनी विडा उचललाय, पण जोपर्यंत...; जयंत पाटलांचा निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com