कोंडाणे धरण गैरव्यवहार प्रकरणी दोषारोप पत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

जलसंपदा विभागाच्या सहा अधिकाऱ्यांसर ठेकेदाराविरोधात दोषारोप

जलसंपदा विभागाच्या सहा अधिकाऱ्यांसर ठेकेदाराविरोधात दोषारोप

ठाणे : कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरण प्रकल्पाच्या कामातील गैरव्यवहाबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ठाणे विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये ठेकेदार कंपनीसह जलसंपदा विभागातील सहा तत्कालीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारी दाखळ करण्यात आलेल्या दोषारोप पत्र तीन हजार पानांचे असून त्यामध्ये एफ. ए. कन्स्ट्रक्शन व एफ. ए. इंटरप्रायझेस या कंपनीचे निसार फतेह खत्री तसेच कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के, तत्कालीन मुख्य अभियंता बी. बी. पाटील, तत्कालीन मुख्य अभिंयता पी. बी. सोनावणे, तत्कालीन अधीक्षक अभियंता आर.डी. शिंदे, तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. पी. काळुखे आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेश रिठे यांचा आरोपपत्रामध्ये समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्राचे तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांचीही चौकशीचा उल्लेख करण्यात आला आहे.
 
जलसंपदा विभागाच्यावतीन कर्जत तालुक्यातील बांधण्यात येणाऱ्या कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्या संदर्भातील तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आला होता. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पामधील गैरव्यवहाराच्या उघड चौकशीचे आदेश दिल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. या प्रकरणी 3 सप्टेंबर 2016 रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे सुमारे तीन हजार पानाचे दोषारोप पत्र ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने ठाणे विशेष न्यायालयामध्ये सादर करण्यात आले. या प्रकरणी ठेकेदार आणि जलसंपदा विभागाचे तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने देण्यात आली.

तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांची चौकशी
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या दोषारोप पत्रामध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांच्या चौकशीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे तटकरे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोषारोप पत्रातील आरोपींमध्ये त्यांचा समावेश नसला तरी त्यांच्या चौकशीनंतरच पुढील गोष्टी स्पष्ट होऊ शकणार आहे.

काय आहे कोंडाणे धरण घोटाळा...
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात उल्हासनदीवर कोंडाणे-चोची हे धरण बांधण्यात येत असून सुरूवातीला या धरणाचा खर्च सुमारे 80 कोटी 35 लाखापर्यंत होता. परंतु त्याचा खर्च वाढवून सुमारे 327 कोटीपर्यंत वाढवण्यात त्यानंतर वाढवून तो 614 कोटीपर्यंत झाला. अंदाजपत्रकामध्ये तरतुद नसताना,  भुसंपादनाशिवाय, वनविभागाच्या परवानग्याशिवाय, धरणाचा आराखडा मंजुर नसताना तसेच प्रशासकिय मंजुरीशिवाय कार्यादेश देऊन या धरणाचे काम सुरू झाले होते. अटी-शर्ती गुंडाळून निविदांमध्ये घोळ करून एफ. ए. एंटरप्रायझेस या संस्थेने हे काम मिळवले. या प्रकरणी तक्रारी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाची तपास सुरू झाला होता. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
थँक यू, मिस डॉ. मेधा  खोले !
श्रीगोंद्यात शाळांमधील दीडशे खोल्या धोकादायक
अक्कलकोट: बोरी नदीत बुडालेल्या तरुणाचा मिळाला मृतदेह
भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'
पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’!
पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!
सजतेय, नटतेय नवी मुंबई
बागवान गल्ली ते सौदी.. रोटचा खुसखुशीत प्रवास 

Web Title: thanew news filed a charge sheet in the Kondane Dam scam case