'साहेब; मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

  • आत्‍महत्‍या करण्यासाठी  सालापूरच्‍या शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
  • विभागीय आयुक्‍ताकडून गंभीर दखल, अनुदानाच्‍या यादीत पैसे दिल्‍याशिवाय नाव घेण्यास नकार

हिंगोली: कळमनुरी तालुक्‍यातील सालापूर येथील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मंगळवारी (ता.4) आत्‍महत्‍या करणार असल्‍याचे कळवले आहे. या प्रकाराने प्रशासनाने एकच धावपळ चालवली आहे.

कळमनुरी तालुक्‍यातील सालापूर येथील शेतकरी रामचंद्र किशनराव पुंड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आपल्‍याकडे 91 आर जमीन असून पत्‍नीच्‍या नावाने 65 आर जमीन आहे. याशिवाय सत्तर आर जमीन त्‍यांच्‍या सुनेच्‍या नावाने आहे.

दरवर्षी हळद, ऊस, कापूस, केळी व काही भाजीपाल्‍याचे पिके ते घेत होते. ऊस लागवड देखील केली आहे. तसेच पाणीपाळ्या देखील लावून बागायती शेती केली आहे. दरवर्षी नियमितपणाने ते पाणीपट्टी भरतात, तरी पण तलाठी सज्‍जा दांडेगाव यांनी शेताची पाहणी न करता ज्‍या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्‍यांची नावे बागायती व कापसाच्‍या शासकीय मदतीच्‍या यादीत टाकली. तेव्‍हा श्री. पुंड यांनी तलाठ्याकडे विचारणा केली असता त्‍यांनी पुरवणी यादीत नाव टाकल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर कळमनुरी तहसीलमध्ये पुरवणी यादी दाखल झाली. नंतर तलाठी भेटला नाही.

त्‍यानंतर पुन्‍हा विचारणा केली असता कागदावर वजन ठेवल्‍याशिवाय काम होत नाही. कापसाचे व बागायतीचे पैसे द्या, त्‍यानंतर काम होईल असे सांगितले. तेव्‍हा श्री. पुंड यांनी त्‍यांच्‍याकडे पैसे नसल्‍याचे सांगितले. त्‍यांच्‍याकडे पूर्ण बागायती ऊस हळद व कापूस याच्‍या पावत्‍या असूनही त्‍यांच्‍यावर नुकसानीची मदत न देण्याचा अन्याय झाला. अशा परिस्‍थितीत न्याय न मिळाल्‍यास त्‍यांनी मंगळवारी (ता.4) डोंगरकडा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर गळफास लावून घेवू किंवा विहिरीत उडी मारून जीव देवू असे या पत्रात म्‍हटले आहे. तसेच आपण मेल्‍यास आपला अंत्‍यविधी तहसीलदार आल्‍याशिवाय करू नका असे या पत्रात म्‍हटले आहे. या पत्रामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित शेतकऱ्याकडे विचारणा केली जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या
भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
Web Title: hingoli news farmer want suicide permission to cm