कोल्हापुरात बसचालकाला हार्ट अॅटॅक; दोघांना चिरडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून कोल्हापूरात उमा टॉकीज चौकात आज (बुधवार) झालेल्या भीषण अपघातात दोन ठार आणि अकरा जण जखमी झाले. बसने पाच दुचाकी आणि तीन चार चाकी वाहनांना धडक दिली. एसटी चालकाला रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कोल्हापूर : हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून उमा टॉकीज चौकात आज (बुधवार) झालेल्या भीषण अपघातात दोन ठार आणि अकरा जण जखमी झाले. बसने पाच दुचाकी आणि तीन चार चाकी वाहनांना धडक दिली. एसटी चालकाला रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. शहरातील ओढ्यावरचा गणपती मार्गावरून एसटी बस उमा टॉकीज चौकाकडे येत होती. त्याचवेळी चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नियंत्रण सुटल्याने सुटल्यामुळे बसने गणपती मंदिर ते उमा टॉकीज चौकापर्यंत गाड्यांना आणि सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना ठोकरले. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः

Web Title: Kolhapur news Kolhapur breaking news two killed in ST bus accident