बामणी फाट्याजवळ मोटार-टेम्पोच्या भीषण अपघातात दोघे ठार

जखमी पवार आणि राऊतला तातडीने उपचाराकरिता सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
road accident
road accidentroad accident
Summary

जखमी पवार आणि राऊतला तातडीने उपचाराकरिता सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

कागल : कागल-निढोरी रस्त्यावर मोटार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या समोरासमोरील धडकेत दोन ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. यामध्ये शनिवार पेठेतील एकाचा समावेश आहे. संतोष ऋतुराज पवार (वय ४७, शनिवार पेठ, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे, तर चंद्रकांत कृष्णा गावकर (वय ५६, ओटवणे, ता . सावंतवाडी) असे दुसऱ्या मृताचे नाव आहे. बामणी फाट्याजवळील आर. के. मंगल कार्यालयासमोर गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाली.

road accident
भारतात सक्रीय रुग्णसंख्येत घट पण ओमिक्रॉनचा धोका वाढतोय

कोल्हापूर येथील संतोष ऋतुराज पवार आणि वाठार येथील वैभव सुरेश राऊत हे दोघे जण पिक-अप व्हॅनमधून मुरगूडहून कागलच्या दिशेने येत होते. याचवेळी चंद्रकांत कृष्णा गावकर (वय ५६, ओटवणे, ता.सावंतवाडी) हे टेम्पो घेऊन सावंतवाडीला निढोरीमार्गे चालले होते. कागल-निढोरी रोडवर शेंडूर बामणी फाटा दरम्यान असलेल्या आर.के.मंगल कार्यालयासमोर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात टेम्पोचालक चंद्रकांत गावकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर संतोष पवार आणि वैभव राऊत गंभीर जखमी झाले होते.

घटनास्थळी कागल पोलिसांनी धाव घेतली. तसेच जखमी पवार आणि राऊतला तातडीने उपचाराकरिता सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना संतोष पवार यांचा मृत्यू झाला, तर राऊतवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की गावकर यांचा मृतदेह स्टेअरिंगध्ये अडकून पडला होता. तो बाहेर काढण्यासाठी पोलिसांना कटरच्या साहाय्याने टेम्पोची स्टेरिंग कट करावी लागली. या अपघाताची नोंद कागल पोलिस ठाण्यात करण्यात आली.

road accident
शिवसेनेची सूत्रं नव्या नेत्यांच्या हातात; दोन बडे नेते बाजूला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com