विधानसभेचे पक्के विरोधक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या छत्राखाली

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 जुलै 2017

मुंबई: विधानसभा निवडणुकित कोल्हापूर शहरात भाजपाच्या वतीने महेश जाधव तर शिवसेनेकडून राजेश क्षिरसागर यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यामध्ये क्षिरसागर यांचा विजय झाला होता. विधानसभेचे एकमेकांचे विरोधक जाधव आणि क्षिरसागर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या छत्राखाली एकत्र आले आहेत.

जाधव हे महसुलमंत्री चंद्रकांत जाधव यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पुढील एक-दोन दिवसात सरकारकडून घोषणा होणार आहे. खजिनदारपदी आमदार राजेश क्षिरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कालच सरकारने सिद्धीविनायक ट्रष्ट मुंबईच्या अध्यक्ष पदी शिवसेनेचे आदेश बांदेकर यांची नियुक्ती केली आहे.

तत्पुर्वी, शिर्डी संस्थानाचे विश्वस्त म्हणून भाजपाने बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांची तर पंढरपूर देवस्थानची जबाबदारी भाजपाचे कराडचे नेते अतूल पाटील यांची निवड केली आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news Western Maharashtra Temple Committee and bjp politics