खांडगावफाट्याजवळ अपघातात एक ठार; चारजण गंभीर जखमी

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

तळेगाव दिघे (जि. नगर): नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून संगमनेरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांच्या होंडा सिटी मोटारीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले. सोमवारी (ता. 2) रात्री साडेदहाच्या सुमारास खांडगावफाटा (ता. संगमनेर) शिवारात सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

सौरभ विलास कडू (वय ३६, रा. बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून सौरभ कडू यांच्यासह चारजण प्रवास करीत होते. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खांडगाव फाटा शिवारात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. एका दुचाकीला हुलकावणी सदर मोटार पलटी झाली. त्यानंतर जखमींना उपचारार्थ संगमनेर येथील तांबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सौरभ कडू यांचा मृत्यू झाला. चार जखमींपैकी एकाला नाशिक उपचारासाठी हलविण्यात आले, तर तिघांवर तांबे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news accident in khandgaon one killed four injured