संगमनेरमध्ये सार्वजनिक विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

संगमनेर तालुक्यातील घटना

तळेगाव दिघे (जि. नगर):  संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला शिवारातील बिरेवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पाण्यात बुडून एका महाविद्यालयीन युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैभव कचरू फड ( वय २२ ) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

वैभव फड हा मित्रांसमवेत बिरेवाडी शिवारातील सार्वजनिक विहिरीवर दुपारी पोहण्यासाठी गेला होता. त्यास चांगले पोहता येत नव्हते. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. नाकात तोंडात पाणी गेल्याने त्याचा विहिरीतच मृत्यू झाला. स्थानिक रहिवाशांनी त्यास विहिरीतून बाहेर काढत संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संपत हरिभाऊ फड यांनी खबर दिली.

वैभव फड हा संगमनेर महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी होता. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने बिरेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आय. के. शेख अधिक तपास करीत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

Web Title: nagar news sangamner one drowned dead