खाकीतील क्रौर्याचा बंद पाळून सांगलीत निषेध

खाकीतील क्रौर्याचा बंद पाळून सांगलीत निषेध

बसगाड्यांवर दगडफेक, टायरी पेटवून रस्ते रोखले

सांगली : पोलिस कोठडीत थर्ड डिग्री वापरुन खून झालेल्या अनिकेत कोथळे प्रकरणी आज (सोमवार) सर्वपक्षीय सांगली बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला. मोटार सायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होत सांगलीकरांनी खाकीवर्दीतील क्रौर्याविरोधात आपला निषेध नोंदवला.

सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने आज सांगली बंदची हाक दिली होती. त्याला सांगली शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, हॉटेल चालकांनी आपले व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला. या बंदमध्ये विविध संघटनाही सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांच्या संतापाच्या दोन बसगाड्या लक्ष्य ठरल्या. सांगली कोल्हापूर रस्ता टायरी पेटवून देऊन बंद ठेवण्याचा प्रयत्न झाला.

सकाळी दहा वाजल्यापासून स्टेशन चौकात विविध भागातून मोठ्या संख्येने तरुण, महिला, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोटारसायकली घेऊन हजर झाले. तेथून शहराच्या विविध भागात फिरुन मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फेरीची सांगता झाली. यावेळी मृत अनिकेतला श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच गुरुवारी सांगलीत कॅंडलमार्च काढण्याचे जाहीर करण्यात आले. दोन बसगाड्या फोडण्याचा प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला.

दरम्यान, आज सकाळपासून मृत अनिकेतच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांची रीघ लागली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार पतंगराव कदम, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सकाळी कोथळे कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर, आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रिती मेनन, ब्रिगेडियर सुधीर सावंत, संघटक डॉ. अमोल पवार यांनीही कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com