साताराः महामार्गावरील भराव पुलावरून पडल्याने युवतीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कऱ्हाड (सातारा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भराव पुलावरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड) येथे घडली.

संबधीत युवती चाफळ (ता. पाटण) नजीकच्या वाघजाईवाडीची येथील असल्याचे समजते. मात्र तिचे नाव समजू शकली नाही. अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, दोन मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या तळबीड पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती कळवूनही एक तासाच्या कालावधीत एकही पोलिस कर्मचारी घटनास्थळाकडे फिरकला नसल्याने उपस्थितानी पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: satara news Death of a girl due to falling from the bridge