Video : मुली म्हणतात...अब हम से है मुकाबला !

Video : मुली म्हणतात...अब हम से है मुकाबला !

सातारा : युवती व मुलींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून कोणत्याही प्रसंगाला सक्षमपणे सामोरे जाण्याचा निर्धार त्यांच्यात निर्माण करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात निर्भया उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबर त्यांची रॅलीही काढण्यात येत आहे.

हेही वाचा - ताई तू घाबरु नकाेस आम्ही आहाेत

या उपक्रमातंर्गत सातारा शहरातील सर्व महाविद्यालयांतील व शालेय मुली राजपथावरील तालीम संघाच्या मैदानावर जमल्या. या वेळी अधीक्षक सातपुते यांनी उपस्थित विद्यार्थिना मार्गदर्शन केले. सुरवातीला सर्व विद्यार्थिनींच्या हातात "सातारा निर्भया स्क्वाडचे' बॅंड बांधण्यात आले. त्या माध्यमातून पोलिस दल तुमच्या पाठीमागे खंबीर आहे, असा संदेश देण्यात आला. 

अवश्य वाचा -  पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंवर कारवाई ?

त्यानंतर महिला कराटेपटूंनी सर्व विद्यार्थिनींकडून वॉर्मअप व स्ट्रेचिंग करून घेतले. त्यानंतर त्यांना स्वसंरक्षणार्थाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा हालचाली व टिप्सची माहिती कराटेपटूंनी युवतींना दिली. या वेळी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, निर्भया पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक जाधव, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जरुर वाचा - टॅक्‍सी चालकाचा प्रामाणिकपणा, 13 लाख केले परत 

तालीम संघाच्या मैदानापासून जिल्हा परिषदेच्या हॉलपर्यंत ही रॅली काढण्यात आली. त्यानंतर दरम्यान, दिवसभरात विविध उपक्रमाद्वारे युवतींना स्वसंरक्षणार्थ प्रात्यक्षिकाद्वारे टिप्स देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये महिला सुरक्षा कशी वाढवता येईल, या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते निर्भया व्हिडीओचे अनावरण करण्यात आले. 

तनिष्कांचा सहभाग
 

सकाळ माध्यम समूहाचे तनिष्का व्यासपीठ सुरवातीपासून महिला सुरक्षितता या विषयावर सातत्याने काम करत आले आहे. महिला सुरक्षिततेचे अनेक कार्यक्रम तनिष्का सदस्यांच्या वतीने आजवर आयोजित करण्यात आले. जिल्हा पोलिस दलाने राबविलेल्या निर्भया उपक्रमातही तनिष्का सदस्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. 


निर्भया पथकांमुळे महिलांमध्ये हाेणार विश्‍वास निर्माण 

कोरेगाव : महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्याबरोबरच ते रोखण्यासाठी स्थापन झालेल्या निर्भया पथकांमुळे महिलांमध्ये विश्‍वास निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे मत पोलिस उपअधीक्षक सुहास गरुड यांनी व्यक्त केले. 

येथील डी. पी. भोसले महाविद्यालयामध्ये पोलिस दल, महाविद्यालय आणि शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांतर्फे आयोजित केलेल्या निर्भया रॅली व परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव व प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत, पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, लेफ्टनंट रुथा जोशी उपस्थित होते. विद्यार्थिनींसाठी सुरक्षित व भयमुक्त वातावरण राखण्याचे पोलिस दलाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

श्री. गरुड म्हणाले, ""युवकांच्या विकृत मानसिकतेमुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. घराबाहेर पडणाऱ्या युवती, महिलांच्या छेडछाडीच्या प्रकारांना रोखण्यासाठी आधुनिक सामुग्रीने परिपूर्ण असलेले निर्भया पथक कार्यरत आहे. या पथकांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये संशयितांवर कारवाई केली जात आहे.''
 
हेही वाचा - बापरे... सदाशिव पेठेत दरोडा; दागिने लंपास

श्री. गोडसे म्हणाले, ""विद्यार्थिनींनी लोक काय म्हणतील, याकडे लक्ष न देता स्वसंरक्षणासाठी तयार राहून छेडछाड करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी निर्भया पथकाची मदत घ्यावी. त्यासाठी पोलिस दल 24 तास उपलब्ध आहे.'' पोलिस दलाने निर्भया पथकाची व्याप्ती वाढवली असून, या उपक्रमास पालकांनी विशेषत: महिलांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. 

पोलिस नाईक दीपाली गुरव यांनी निर्भया पथकाविषयी माहिती दिली. कराटे प्रशिक्षिका तमन्ना रिनवा यांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. निर्भया पथकातील पोलिस नाईक इंदूताई घाडगे, वर्षाराणी शिंदे, दीपाली गिरी, हेमंत शिंदे, अजय गुरव, किशोर भोसले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. राष्ट्रीय छात्रसेनेचे लेफ्टनंट प्रा. बाळकृष्ण भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. संगीता वीरकर यांनी सूत्रसंचालन केले. देवकी भोसले यांनी आभार मानले. 

धाडसी युवतीचा गौरव 

कोरेगाव तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी कोरेगावात येणाऱ्या एका युवतीला दोन दिवस युवक त्रास देत होता. तिसऱ्या दिवशी मात्र या युवतीने संबंधित युवकाला चार- चौघांत चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर पोलिस ठाण्यात प्रकरण आल्यानंतर या युवतीने दाखवलेल्या हिमतीचा अन्य युवतींनीही आदर्श घ्यावा, या हेतूने या युवतीचा पोलिस उपअधीक्षकांच्या हस्ते विशेष सत्कार झाला. 

मुलींच्या सुरक्षिततेबाबत निर्भयामुळे जागृती

फलटण : निर्भयाच्या माध्यमातून पोलिस प्रशासन मुलींची सुरक्षितता व स्वसंरक्षणासाठी राबवित असलेल्या जागृतीच्या उपक्रमामुळे युवतींमध्ये धीटपणा येण्यास मदत होणार असून, आगामी काळात समाजस्वास्थ्य टिकण्यास मुलींची निर्भयता निश्‍चितच उपयुक्त ठरेल, असे मत प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केले. 

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने राजाळे येथे आयोजिलेल्या महाराजस्व समाधान अभियानात फलटण पोलिसांनी निर्भया उपक्रमाबाबतचा स्टॉल उभारला होता. स्टॉलला श्री. शिंदे यांनी भेट दिली असता पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी स्वागत करून निर्भया उपक्रमाची माहिती दिली.

नक्की वाचा - नाताळगाणी वाढवितात ख्रिसमसचा उत्साह

ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या युवतींच्या होणाऱ्या छेडछाडीतून सुटका व सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणेचे सहकार्य व पोलिस संपर्क याबाबत माहिती दिली. फलटण शहरात शालेय मुली व महाविद्यालयीन युवती यांच्या सहभागातून जिल्हा अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या उपस्थितीत नुकत्याच काढलेली रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे बरडे यांनी सांगितले.
 
समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी मुलींची सुरक्षितता व स्वसंरक्षण याची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे. फलटण पोलिसांनी यासाठी घेतलेला पुढाकार अपप्रवृत्तीला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. या वेळी त्यांनी शालेय मुलींशीही संवाद साधला. 


समाजाची विचारसरणी बदलण्याची गरज 

फलटण शहर : समाज चांगला व सुसंस्कृत बनवायचा असेल तर मुली व महिलांना निर्भयतेने जगता येणे आवश्‍यक आहे. त्याकरिता समाजातील विचारसरणी बदलण्याची आवश्‍यकता आहे. ती कुणी घटक अथवा एक जण बदलू शकत नाही. त्यासाठी समाजाला सामूहिकपणे एकत्र यावे लागेल, असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.
 
मुधोजी क्‍लब मैदानावर निर्भया रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अडीच हजार मुला-मुलींची उपस्थिती होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, ऍड. मधुबाला भोसले, पोलिस निरीक्षक प्रताप पोमण, पोलिस निरीक्षक नितीन सावंत उपस्थित होते.

हेही वाचा - ऐकलंत का... सातारा पालिकेचे अधिकारी टाकतात पाट्या 

मुली अथवा महिलांना कुणी त्रास देत असेल तर ते सहन करू नका. अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा अधिक दोषी असतो. कोणतेही भय न बाळगता धैर्य दाखवावे, असे स्पष्ट करून सातपुते यांनी पालकांनीही आपल्या मुलांची संगत कोणाची आहे, याबाबत सजग राहायला हवे. मुलांवर एखादा गुन्हा नोंद झाला तर त्याचे अनेक विपरीत परिणाम त्यांना भोगावे लागतील, याची जाण त्यांना करून द्यावी, असे आवाहन केले. प्रारंभी मुलींना सुरक्षिततेबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मुलींची रॅली काढण्यात आली. 

विद्यार्थिनींनी घ्यावेत स्वसंरक्षणाचे धडे : नीलेश सजगणे

मायणी : विद्यार्थिनींनी शालेय जीवनातच नियमितपणे व्यायाम, सकस आहार व स्वसंरक्षणाचे धडे घ्यायला हवेत. मग कोणत्याही प्रसंगाला दोन हात करण्याची ताकद आल्याशिवाय राहणार नाही, असे मत निर्भया पथकाचे पोलिस नाईक नीलेश सजगणे यांनी व्यक्त केले. 

चितळी (ता. खटाव) येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात आयोजित समुपदेशन कार्यक्रमात श्री. सजगणे बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. जे. सदामते होते. श्री. सजगणे म्हणाले, ""मुलींची छेडछाड काढली जाते. मुलींचा पाठलाग केला जातो. त्यांच्याशी आधी मैत्री करून नंतर अश्‍लिल मेसेज पाठवले जातात. विचित्र हावभाव करण्यात येतात. असे प्रकार घडत असल्यास संबंधित मुलींनी तत्काळ पोलिस ठाणे अथवा निर्भया पथकाशी संपर्क साधावा. तसेच 100 किंवा 1091 या फोन क्रमांकावर संपर्क साधावा. तातडीने आवश्‍यक ती मदत पोलिसांच्या माध्यमातून केली जाईल.''
 
दरम्यान, विद्यालयात निर्भया सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी महिला पोलिस शिपाई एस. टी. पवार, होमगार्ड एल. पी. टेम्बरे, महेश खाडे, एस. बी. रायनडे, गणेश जाधव, एस. के. जाधव आदी मान्यवरांसह शिक्षक उपस्थित होते. यु. बी. जाधव यांनी आभार मानले. 

ब्रिलियंट ऍकॅडमीमध्ये निर्भया पथकाचे प्रबोधन
 
फलटण : शहरातील ब्रिलियंट ऍकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये निर्भया पथकाने प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून, सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात, मोबाईलवर व्हॉट्‌सऍप व फेसबुक वापरताना कोणती काळजी घ्यावी, त्याद्वारे घडणारे गुन्हे याबाबत माहिती दिली.

अवश्य वाचा - सेना आमदाराच्या तक्रारीवर एसपींचे हे उत्तर 

पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे आणि पोलिस निरीक्षक पोमण यांनी मोटार अपघात झाल्यानंतर कुटुंबावर होणारे परिणाम, अल्पवयीन मुलाने मोटारसायकल चालविल्यावर त्यांच्या पालकांवर दाखल होणारे गुन्हे याबाबत माहिती दिली. तसेच "प्रतिसाद' नावाचा ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याचे आवाहन केले.
 
मुलींच्या सुरक्षिततेबाबत शहरातील बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग करताना निर्भया पथकाने रोडरोमिओंवरती कारवाई केली. तसेच लक्ष्मीनगर येथील स्माईल कॉपी कॅफे येथे अचानक भेट देऊन कॅफेमध्ये शालेय गणवेशात मित्रांसोबत मिळून आलेला बारा मुला-मुलींना ऑफिसमध्ये आणून त्यांचे समुपदेशन केले. त्याशिवाय त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन मुला-मुलींना योग्य ती समज देण्याच्या सूचना केल्या. तसेच सर्व कॅफेचालक मालकांना 149 प्रमाणे नोटीस बजावत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
प्रितीसंगम बागेत स्वावंलबनाचे धडे

कऱ्हाड : रस्त्यातील सडक सख्याहारी अथवा त्रास देणारा चौकातील टपोरी मवाली, त्याच्याशी दोन हात करून मुलींनी स्वावंलबी व्हावे, यासाठी शहर पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने महिलांचे संरक्षण अन्‌ टपोऱ्यांचे उच्चाटन या विशेष विशेष कार्यक्रमाचे शहरात आयोजन केले होते.

जरुर वाचा -  कर्‍हाड पोलिस लय धडाकेबाज... मोक्काचे अर्धशतक 

येथील प्रितीसंगम बागेत झालेल्या कार्यक्रमात निर्भया पथकाच्या माध्यमातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यानींना स्व संरक्षणाचे धडे दिले. त्यांना निर्भया बनण्याची शिकवण देण्यात आली. यावेळी निर्भया पथकाची निर्भया बना अशी शहरातून रॅलीही काढली. शहर पोलीस ठाण्यातंर्गत पोलिस उपाधीक्षकांच्या निर्भया पथकाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. त्यात शहरातील विद्यार्थ्यांनींनी विशेष सहभाग घेतला होता. महिलांच्या संरक्षणार्थ विद्यार्थ्यांचे संरक्षण व टपोऱ्यांचे उच्चाटन असे त्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. 

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपाधीक्षक अशोक थोरात, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्ष निलम येडगे उपस्थित होते. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, कऱ्हाड, मलकापूरातील हायस्कूल व महाविद्यालयातील महिला प्राध्यापक उपस्थित होत्या.

यावेळी महिलांना संरक्षणसाठी कराटे प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. येथील प्रितीसंगम बागेत कार्यक्रम झाला. त्यानंतर निर्भया रॅली काढण्यात आली. अर्बन बॅंकेच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक सातपुते यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी गप्पा मारत मुलींच्या अडचणी विचारल्या त्यातून सुटण्याचे मार्गही सांगितले.



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com