
Prathamesh Laghate: प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. प्रथमेश आणि गायिका मुग्धा लघाटे (Mugdha Vaishampayan) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी धुमधकाड्यात पार पडला. त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता लघाटे कुटुंब त्यांच्या नवीन व्यवसायामुळे चर्चेत आहे. नुकतीच प्रथमेश आणि मुग्धा यांनी त्यांच्या आंबे विक्रीच्या व्यवसायाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली. त्यांच्या या कमेंट करुन अनेकांनी त्यांना या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. अशातच आता एका नेटकऱ्यानं प्रथमेशला त्याच्या या नव्या व्यवसायावरुन ट्रोल केलं. या ट्रोलरला प्रथमेशनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
प्रथमेश लघाटेनं त्यांच्या आंबे विक्री व्यवसायाबद्दल एक पोस्ट शेअर केली. या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "शेतकऱ्यांकडून आंबे घेऊ, तुमच्याकडून कधीच नाही" नेटकऱ्याच्या या कमेंटला प्रथमेशनं रिप्लाय दिला आहे.
"कुठूनही घ्या हो, पण आंबा खा आणि थंड व्हा" असा रिप्लाय प्रथमेशनं नेटकऱ्याच्या कमेंटला दिला. प्रथमेशच्या या रिप्लायवर त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, "कुठूनही नाही शेतकऱ्यांकडून, त्यामुळेच तुमच्याकडून नाही" यावर प्रथमेश म्हणाला,"कुठूनही म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याकडून, सिंपल, माझी भाषा तुम्हाला समजायला खूपच अवघड आहे असं दिसंतय, तुम्ही स्वत: इन्स्टावर ओळख लपवली, फॉलोवर्सही शून्य, त्यामुळे नकाच घेऊ तुम्ही आमच्याकडून आंबे, कारण स्वत:ची ओळख लपवणाऱ्यांनी एखाद्या बरी ओळख असणाऱ्याकडून आंबे घेणे शोभत नाही अण्णा"
त्या नेटकऱ्यानं प्रथमेशला आणखी एक कमेंट केली. या कमेंटमध्ये त्यानं लिहिलं, "तुमच्यावर आंबे विकणाची वेळ आली यावरुनच कळतय तुमची किती ओळख आहे. माझा इनकम ऐकून रात्री झोप येणार नाही तुम्हाला"
यावर प्रथमेश म्हणाला, "स्वत:हूनच स्वत:ला ग्रेट म्हणण्यापेक्षा आंबे विकलेले बरे आणि एवढं इनकम असूनही फॉलोवर्स शून्यच?" प्रथमेशच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.