Office Politics : ऑफिसमधील पॉलिटिक्स शिकून घेणे ही मूलभूत गरज?

सात मुद्द्यांच्या माध्यमातून तज्ज्ञांचे विश्लेषण
office politics
office politicsesakal

मुंबई : आपल्यातील अनेकांना राजकारणापेक्षा देखील जास्त राग येणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे ऑफिसमधील राजकारण. एकमेकांचे पाय खेचणे, एखाद्याच्या मागे गॉसिप करणे, तेच तेच विषय चघळत राहणे, सतत कोणालातरी खाली दाखवणे असे सगळे प्रकार अनेकांच्या ऑफिसमध्ये घडत असतील.

नोकरीतील प्रगतीसाठी जी लोकं अशा प्रकारची शक्कल लढवतात ती माणसं अनेकदा सहकाऱ्यांमध्ये चेष्टेचा विषय बनतात.

असे जरी असले तरीही जर यातून बदल घडत असतील तर मात्र अशी शक्कल लढविणाऱ्यांचा देखील हेवा वाटायला हवा.

अनेक जण हे ऑफिसमधील गप्पा, मित्र, आजूबाजुला घडणाऱ्या घटनांपासून स्वतःला वेगळे ठेवतात.

ज्यामुळे अनेकदा ते दुर्लक्षित, आळशी वाटतात किंवा त्यांच्याविषयी सहानुभूती वाटू लागते. अमेरिकेत अशा लोकांसाठी सहानुभूती पार्टी करण्याची देखील पद्धत आहे.

पण ही सहानुभूती जेव्हा टोक गाठते तेव्हा मात्र अशा लोकांना योग्य सल्ल्याची गरज असते. हा शांत किंवा एकटे राहण्याचा किंवा सगळ्यापासून वेगळे राहण्याचा उपाय अनेकदा चांगला ठरतो पण त्याहीपेक्षा कधीकधी या गोष्टी स्वीकारून पुढे जाणे हे अधिक फायदेशीर ठरते.

(Latest Marathi news about Office Politics)

office politics
Mental Health : तुम्हालाही प्रत्येक गोष्टीवर रिऍक्ट होण्याची सवय लागलीय का? या टिप्स करतील मदत

संघटनात्मक वर्तणूक (organisational behaviour) या विषयाचे अमेरिकेच्या स्टँडफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक जेफ्री फेफर त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'go-to theorist of office politics' या पुस्तकात याची उत्तरे कदाचित सापडू शकतात.

सगळ्यापासून लांब राहण्याची इच्छा का होते?

यामध्ये 'पॉवर' विषयात सात नियमांतून प्रा जेफ्री फेफर सांगतात की, सर्वांपासून वेगळे राहणाऱ्या या व्यक्तींना सत्ता, शक्ती अशा गोष्टींपासून वेगळे राहण्याची इच्छा होते कारण त्यांना असे वाटते की या गोष्टी करणे वाईट आहे किंवा अनेक वाईट लोकच अशा गोष्टी करतात, म्हणून ते या सगळ्यापासून लांब राहणेच पसंत करतात.

परंतु त्यामुळे एकतर ते अनेक निर्णयांत बळी ठरतात आणि त्यांना खेळी करण्याचे फायदे देखील मिळत नाहीत.

कामावर आणि आरोग्यावर नेमका कोणता परिणाम?

'कामातील राजकारण' या सर्वसमावेशक मेटा अभ्यासात असे दिसून आले आहे की, अशा व्यक्ती किंवा अशी वागणूक ही नोकरीतील समाधान, कामाची उत्पादकता, करिअरमधील यश आणि वैयक्तिक प्रतिष्ठा आणि शारीरिक ताण या सर्व गोष्टीत नकारात्मक प्रभाव पडणारी आहेत.

म्हणजेच मूळ प्रवाहापासून वेगळे राहण्यामुळे तुमचातील उत्पादकता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर परिणाम होताना दिसतो.

(how you balanced your work life? )

office politics
Stress : तरुणाईने शोधलंय मानसिक ताणावरील उत्तर

ऑफिसमधील पॉलिटिक्स शिकून घेणे ही मूलभूत गरज?

प्रा.जेफ्री फेफर हे त्यांच्या पुस्तकात कुठेही उगाचच खोटे आशादायी चित्र निर्माण करत नाहीत. ते सांगतात ऑफिसमधील पॉलिटिक्स शिकून घेणे ही तुमची मूलभूत गरज आहे.

वास्तवात ज्या गोष्टी घड्तायेत त्या स्वीकारूनच तुम्हाला पुढे जावे लागणार आहे.

कधीतरी आशेचा किरण दिसेल असल्या भ्रामक कल्पना आता कोणीच मानत नाहीत.

स्वतःचे अस्तित्व दाखवा, आत्मविश्वासाने वावरा..

प्रा.फेफर यांनी दिलेले धडे हे कॉर्पोरेट जीवनशैलीत योग्य पद्धतीने लागू पडतात. ज्यांना या दिशेने प्रवास करत स्वतःमध्ये काही बदल घडविण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी या पुस्तकात या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे अस्तित्व दाखवणे, आत्मविश्वासाने वावरणे, जिथे जिथे तुमचे अधिकार आहेत तिथे त्यांचा वापर करणे, तुमचं स्वतःचं एक नेटवर्क तयार करणे, सिस्टीममधला महत्वाचा दुवा बनणे आणि स्रोत बनणे गरजेचे आहे.

(worklife balance in corporate office)

office politics
Office Outfit Ideas : ऑफिसमध्ये स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘या’ टिप्सची घ्या मदत

डावपेच खेळणाऱ्या व्यक्तींकडून शिका

तुम्हाला बदल हवा असेल तर स्वतः ठरवलेल्या मार्गातून बाहेर पडणे आवश्यक आहे. स्वतःच्याच प्रचारात गुंतलेल्या आणि डावपेच खेळणाऱ्या व्यक्तींबाबत नाराज राहण्यापेक्षाही ते ज्या पद्धतीने या राजकारण करून गोष्टी करतात त्या गोष्टी शिकून घेणे जास्त गरजेचे आहे.

'शेवटी न्यायाचाच विजय होतो' अशा कल्पना घेऊन जर जगणार असाल तर तुम्हाला तुमच्या कामातून आनंद मिळेल याची शक्यता सोडा.

आधीप्रमाणे वागत राहिलात तर..

लेखक म्हणतात की, मला चुकीच्या अर्थाने घेऊ नका. वास्तविक जीवनात राजकारण शिकणे हे माझ्या एकुणातच आयुष्यासाठी महत्वाचे आहे.

पण म्हणून मी संपूर्णपणे प्रा. फेफर यांना वाहून नेलेले नाही. प्रा. फेफर म्हणतात की, वास्तविक आयुष्यात वर्तणुकीतील हे बदल तुम्हाला मूळ मूल्यांपासून दूर नेत असल्यासारखे वाटतील.

याउलट मला वाटते की, तुम्ही जर आधीप्रमाणे वागत राहिलात तर तुम्हाला परत त्याच सहानुभूती प्रकरणाचा सामना करावा लागेल.

अनुभवानुसार धोरण बदला..

मध्यम अनुभवाच्या लोकांनी कामात पुढे जात असताना तुमच्या क्षमता आणि सामर्थ्य देखील वाढणे आवश्यक आहे. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने हुशार असते. तुम्हाला तुमचे वेगळेपण दाखवत प्रभाव पाडता येणे आवश्यक आहे.

कामाच्या अनुभवात जसं आपण प्रौढत्वकडे येतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या आणि इतर लोकांच्या धोरणांचा मेळ घालत काम करतो. या ठिकाणी आपले स्थान सुरक्षित करणे किंवा किमान आपल्याविषयी तक्रारीचा सूर निर्माण होणार नाही असा आपला प्रयत्न असतो.

(मूळ संदर्भ : फायनान्शियल टाइम्स वृत्तपत्रातील लेख )

(How to deal with office politics)

(are you victim of back stabbing?)

-----------

office politics
ऑफिसमधल्या Groupism वर उपाय काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com