आर्य नागार्जुन संग्रहालयाचा रौप्यमहोत्सवी सोहळा

आर्य नागार्जुन संग्रहालयाचा 
रौप्यमहोत्सवी सोहळा
Published on

पुणे, ता. १९ : बौद्ध इतिहास, संस्कृती आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या आर्य नागार्जुन संग्रहालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा सोहळा नुकताच उत्साहात झाला. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात संग्रहालयाच्या २५ वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाचा आढावा घेण्यात आला, तसेच संग्रहालयाच्या जतन, संवर्धन आणि विस्तारासाठी योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात पाली भाषेचे अभ्यासक, लिपीतज्ज्ञ आणि लेणीसंवर्धक अतुल भोसेकर यांनी ‘बौद्ध संग्रहालयाची वैश्विकता’ या विषयावर विशेष व्याख्यान दिले. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी संग्रहालयाच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. शासनाचे अवर सचिव बाळासाहेब सावंत यांनी कै. दिलीप वानखेडे यांच्या ऐतिहासिक संग्रहकार्याचा गौरव करत संग्रहालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी स्त्रीभूषण रमाई आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, नगरसेवक नीलेश आल्हाट, वसुंधरा भोसेकर आदी उपस्थित होते. कल्पना वानखेडे यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन दीपक मस्के यांनी केले. संयोजन कुलदीप वानखेडे, हर्षवर्धन वानखेडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com