पिंपरीचे माजी महापौर मुंबईतल्या अतिवृष्टीतून बचावले केवळ मोठ्या गाडीमुळे!

yogesh bahal
yogesh bahal

पिंपरी (पुणे) मुंबईत 26 जुलै 2006 च्या महाप्रलयाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या परवाच्या मुसळधार पावसानेही पुन्हा एकदा परवा मुंबापुरीला "ओली'स धरले. त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत. पाणी मुरलेल्या जुन्या इमारतींची व दरडींची पडझड आता सुरू झाली आहे. त्यात दोन डझन बळी गेले आहेत. या"ओली'स मध्ये पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व विद्यमान विरोधी पक्षनेते योगेश बहल सापडले होते. सुदैवाने "लॅंड क्रूझर'सारखी मोठी मोटार असल्याने ते या अतिवृष्टीतून बचावले. 11 तास ते एकाच ठिकाणी अडकून पडले होते. नजरेसमोरून छोट्या मोटारी वाहत जाताना पाहिल्यानंतर भीतीने काही काळ मन धास्तावले होते, असे या संकटातून बचावलेल्या बहल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर असलेले बहल हे सध्या विरोधी पक्षनेते आहेत. प्रथितयश बांधकाम व्यावसायिक म्हणून ते ओळखले जातात. 29 ऑगस्टला त्यांची मुंबई विमानतळाजवळील "आयटीसी मराठा'या तारांकित हॉटेलात बिझनेस मीटिंग होती. त्यासाठी ते आपले भागीदार अमित फेफडे व संदीप दिघे यांच्यासह गेले होते. मीटिंग अडीच वाजता संपली. ते पुन्हा पुण्याला (पिंपरी) यायला निघाले. दरम्यान, बाहेर पाऊस सुरू होता. नंतर त्याने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण मुंबई जलमय झाली. अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी कार्यालयापाशी ते कसेबसे आले. तेथून मानखुर्द येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर येण्यासही त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र, तेथे ते आले आणि अडकून पडले. ते तब्बल 11 तास गाडीतच त्यांना बसून राहावे लागले.

या कालावधीत साचलेल्या पाण्यात छोट्या अनेक मोटारी बुडाल्या. तर, काही वाहून जाताना पाहिल्याने भीतीने क्षणभर गाळणच उडाल्याचे बहल म्हणाले. मात्र, मोठ्या अशा उंच मोटारीत आम्ही चौघे (चालकासह) असल्याने रस्त्यावर कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यापासून सुदैवाने वाचलो, असे ते म्हणाले. रात्री उशिरा पाऊस आणि पाणी काहीसा ओसरल्यानंतर ते कसेबसे नवी मुंबईत वाशी येथे पोचले. गणेशोत्सवामुळे हॉटेल्स उशिरापर्यंत उघडी असल्याने तेथे भुकेने व्याकूळ झालेल्या चौघांनी क्षुधाशांती केली. अखेर पहाटे साडेतीन वाजता ते घरी पोचले. अशारीतीने मुंबई ते पिंपरी या तीन तासांच्या प्रवासाला त्यांना मंगळवारी 13 तास लागले. महापुराच्या विदारक अनुभवाला आयुष्यात पहिल्यांदाच यानिमित्त सामोरे गेलो, अशी प्रतिक्रिया त्यातून पूर्णपणे सावरलेल्या बहल यांनी आज दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
येथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा

'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'
आणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला 
मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू
पाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा 
मुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट
कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर
ठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल
सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com