शिरूर बाजारात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

शिरूर (पुणे): "किसान क्रांती' संघटनेने पुकारलेल्या शेतकरी संपाला आज (गुरुवार) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरूर बाजार आवारातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून शेतकऱ्यांबरोबरच; स्थानिक छोट्या-मोठ्या भाजीपाला व्यापाऱ्यांनीही संपात सहभाग घेतला. काही शेतकरी दूध घेऊन आले होते; परंतु संप चालू असल्याचे पाहून त्यांनी उत्स्फूर्तपणे दूध ओतून दिले.

शिरूर (पुणे): "किसान क्रांती' संघटनेने पुकारलेल्या शेतकरी संपाला आज (गुरुवार) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरूर बाजार आवारातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून शेतकऱ्यांबरोबरच; स्थानिक छोट्या-मोठ्या भाजीपाला व्यापाऱ्यांनीही संपात सहभाग घेतला. काही शेतकरी दूध घेऊन आले होते; परंतु संप चालू असल्याचे पाहून त्यांनी उत्स्फूर्तपणे दूध ओतून दिले.

किसान क्रांती कृती समितीचे शिरूर तालुकाध्यक्ष नितीन थोरात यांच्यासह डॉ. हिरामण चोरे, रवींद्र बापू सानप, प्रकाश थोरात, आबासाहेब जाधव, बी. आर. माशेरे, अशोक माशेरे, राहुल शिंदे, संजय दसगुडे, राहुल नऱ्हे, कैलास पवार, संतोष चाकणे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी पहाटे पाच वाजेपासूनच येथील बाजार समितीच्या प्रवेशद्‌वारासमोर ठाण मांडले. दरम्यान, कृषी माल विक्रीसाठी काही तुरळक शेतकरी आले होते, परंतु त्यांनीही मालाची विक्री न करता संपात सहभाग घेतला. छोट्या भाजीपाला व्यापाऱ्यांनीही शेतमालाची विक्री न करता संपात सहभाग घेतला.

सकाळी दहा वाजेपर्यंत हे शेतकरी प्रवेशद्‌वारात धरणे धरून बसले होते. "शेतकरी एकजुटीचा विजय असो', "शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे', "जय जवान जय किसान' च्या घोषणा देत शेतकऱ्यांनी प्रवेशद्‌वार रोखून धरले. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष मोरे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. सर्व संचालकांशी विचारविनीमय करून संपकाळात शिरूर बाजार बंद ठेवला जाईल, असे त्यांनी सांगितले. एक ते दहा जून या काळात हा संप असून, संपाचे दहा दिवस रोज शिरूर बाजार समितीच्या प्रवेशद्‌वारासमोर धरणे धरले जाईल, असे नितीन थोरात यांनी सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने संपात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: pune news farmer strike in shirur