पुणेः नियोजीत कचरा प्रकीया प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू

संदीप जगदाळे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हडपसर (पुणे): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील नियोजीत कचरा प्रकीया प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर यांनी सोमवारी सुरू असलेले प्रकल्पाचे काम बंद पाडून तेथील कर्मचा-यांना हाकलून दिले होते.

दरम्यान, योगेश ससाणे यांना वानवडी पोलिसांनी पूर्व कल्पना न देता काम बंद पाडल्याबाबत लेखी समज दिली आहे. लोकशाही पध्दतीने पोलिसांची परवानगी घेवून आंदोलन करावे, तसेच महापालिकेचे काम बंद ठेवावे असे पत्र दाखवावे, तरच हे काम थांबवावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल अशी समज दिली आहे. दरम्यान, ससाणे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाचे काम थांबवावे, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौरांनी तूर्त हे काम बंद करू, असे अश्वासन दिल्याचे नमूद केले. मात्र, प्रत्यक्षात हे काम सुरू आहे.

येथील कचरा डेपोमुळे तेथील कंपन्या व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, पूर्वीच या ठिकाणी महापालिकेचे दोन कचरा प्रकल्प असताना नव्याने होवू पाहणा-या डेपोच्या विरोधात औद्योगिक वसाहतीतील काऱखान्यांचे मालक व कामगार तसेच शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. तसेच कचरा डेपो हटवा कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी डेपोला विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रसंगी न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. मात्र महापालिकेकडून या ठिकाणी पून्हा पोलिस बंदोबस्तात डेपोचे काम सुरू केल्याने हा प्रश्न पेटला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: pune news hadapsar planned garbage project and police