दिपाली बारावीत साळंत पहिली आली, लय आनंद झाला...

युनूस तांबोळी
सोमवार, 3 जुलै 2017

टाकळी हाजी (पुणे): माव काय शिक्षण झाल नाय... नवऱ्याला याड लागल्यान त्यो कुठ गेला माहित नाय, पण तीन पोरी संभाळायाच्या व्हत्या. काय कराव कळत नव्हत, शेतात मोलमजूरी केली लय वंगाळ दिस काढल. म्हाव्या हातात खुरप हाय पर पोरीच्या हातात पेन देऊन त्यांना शिकवायचय मला. सुरेखा बारावीत साळंत पहिली आली लय आनंद झाला सर... डाव्या हातान पदर डोळ्याला लावत आनंदाश्रू लपवत चिंचोली मोराची (ता. शिरूर, जि. पुणे) येथील पारधी समाजातील शेतमजूरी करणारी सुरेखा काळे हिच्या प्रतिक्रिया येत होत्या.

टाकळी हाजी (पुणे): माव काय शिक्षण झाल नाय... नवऱ्याला याड लागल्यान त्यो कुठ गेला माहित नाय, पण तीन पोरी संभाळायाच्या व्हत्या. काय कराव कळत नव्हत, शेतात मोलमजूरी केली लय वंगाळ दिस काढल. म्हाव्या हातात खुरप हाय पर पोरीच्या हातात पेन देऊन त्यांना शिकवायचय मला. सुरेखा बारावीत साळंत पहिली आली लय आनंद झाला सर... डाव्या हातान पदर डोळ्याला लावत आनंदाश्रू लपवत चिंचोली मोराची (ता. शिरूर, जि. पुणे) येथील पारधी समाजातील शेतमजूरी करणारी सुरेखा काळे हिच्या प्रतिक्रिया येत होत्या.

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत 75.69 टक्के गूण मिळवून विद्यालयात दिपाली प्रदीप काळे ही प्रथम आली. शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर शेतावर आईबरोबर ती मोलमजूरी करत होती. त्यावेळी त्यांचा जीवनपट पुढे आला. पारधी समाजातील भोसले कुटूंबात जन्म घेतल्यावर काळे कुटूंबात सुरेखाचे लग्न झाले. तीन मुली, पती, सासु सासरे असा प्रपंच होता. नवऱ्य़ाला दारूच्या व्यसनामुळे वेड लागलं. त्यामुळे तो कुठ गेला माहित नाही. सासू सासऱ्याच निधन झाल्यावर सुरेखा एकाकी पडली होती. तिने शेतावर मोलमजूरी करून तीन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणल आहे. मोठी मुलगी दिपाली हिने बारावीच्या परीक्षेत 75.69 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. वेळप्रसंगी उपाशी तर आईबरोबर शेतमजूरी करून तीने शिक्षणाचा प्रवास सुरू केला आहे.

खडतर जीवनाच्या वाटेवर काटेरी कुंपनात वेळ मिळेल त्यावेळी अभ्यास करत तिने आईच्या कष्टाला साथ दिली आहे. पुढील शिक्षणासाठी पाबळ येथील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आहे. शिक्षण थांबू नये यासाठी ती देखील आईच्या खांद्याला खांदा देऊन काम करताना पहावयास मिळत आहे. पारधी समाजात शिक्षणाची गोडी निर्माण करणारी आई... हे दुर्मीळ उदाहरण आहे. दुसरी मुलगी दहावी तर तिसरी मुलगी पाचवीत शिकत आहे. पत्र्याचं छोटखानी घर अन् या कुटूंबाच शिक्षणासाठी घेत असलेले कष्टही महत्वाचे आहेत. अशा कष्टाळू आईला मुलींच्या शिक्षणासाठी मदतीचा ओघ झाला तर तिची जिद्द वाढण्यास मदत होईल.

मला अधिकारी व्हायचय...
आमच्या समाजात शिक्षणाला महत्व नसतया. शिकून काय करणार हाईस... अस म्हणून लय नाव ठेवत्याती. पण मला आईच्या कष्टाला साथ द्यायची. दोन बहिनींना शिकवून मोठ करायचय. शिक्षक शाळेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी माहिती देत असतात. त्यातून वाचन अभ्यास करून मला लय शिकायचय. मोठ अधिकारी व्हायचय... अशी प्रतिक्रिया दिपालीने दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या
भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
Web Title: pune news kanhur mesaai deepali kale hsc pass news