ए मेरे प्यारे वतन... तुझ पे दिल कुर्बान !

स्वप्नील जोगी
बुधवार, 26 जुलै 2017

घोरपडीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात (नॅशनल वॉर मेमोरियल) लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि जवानांकडून भारत-पाकिस्तान दरम्यानच्या कारगिल युद्धाचा विजय दिन आज साजरा करण्यात आला. या वेळी विविध देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. 

पुणे : सकाळी सव्वा आठची वेळ. आभाळ अगदी जमिनीपर्यंत गच्च भरून आलेलं. पण पाऊस मात्र अजून सुरू व्हायचा होता... आणि या काळ्याकभिन्न मेघाच्छादित पार्श्वभूमीवर कानांवर शब्द येऊ लागले- "ए मेरे प्यारे वतन, ए मेरे बिछडे चमन, तुझ पे दिल कुर्बान'... मन्ना डे यांच्या अंतर्मूख करणाऱ्या आवाजातलं "काबुलीवाला'मधलं हे देशभक्ती जागवणारं गाणं बुधवारी साजऱ्या होणाऱ्या "कारगिल विजय दिना'चं महत्त्व अधिकच गहिरेपणाने अधोरेखीत करताना जाणवत होतं.

घोरपडीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात (नॅशनल वॉर मेमोरियल) लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि जवानांकडून भारत-पाकिस्तान दरम्यानच्या कारगिल युद्धाचा विजय दिन आज साजरा करण्यात आला. या वेळी विविध देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. 

सकाळच्या गार हवेत उंचच उंच स्तंभावर दिमाखात लहरणारा तिरंगा आपल्या देशाच्या उत्तूंगतेची प्रचिती क्षणोक्षणी करून देत होताच. त्यालाच साथ होती ती बॅन्डपथकाच्या "सारे जहॉं से अच्छा'च्या सुरेल धूनसोबत शहिदांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेची अन शिस्तबद्ध सलामीची !... शहिदांच्या स्मृतींना उजाळा देणारी स्तंभासमोरील क्रांतीज्योत या वेळी उठून दिसत होती. दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल आर. जे. नरोन्हा या वेळी उपस्थित होते. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Pune news Kargil din celebrate in Pune