पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी

प्रसाद पाठक
शनिवार, 10 जून 2017

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सरकारी कामाला थोडा उशीर झाला तरी चालेल. पण पक्ष महत्त्वाचा असे सूचित करून मोदी फेस्टचे उदघाटन केले. दहा मिनिट नगरसेवकांशी संवाद साधून बापटांनीही काढता पाय घेतला.

पुणे - मोदी फेस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कामाचा गाजावाजा करण्यात येत असताना, दुसरीकडे आज (शनिवार) पुण्यात झालेल्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे आणि आठही मतदारसंघाच्या आमदारांनी पाठ फिरवली.

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सरकारी कामाला थोडा उशीर झाला तरी चालेल. पण पक्ष महत्त्वाचा असे सूचित करून मोदी फेस्टचे उदघाटन केले. दहा मिनिट नगरसेवकांशी संवाद साधून बापटांनीही काढता पाय घेतला. कार्यक्रमाला शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह मोजकेच नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

खासदार, आमदारांच्या अनुपस्थितीचा मुद्याला बगल देत गोगावले म्हणाले, हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. काल रात्री उशीरा निरोप मिळाला. त्यानंतर एसएमएसवरून निरोप दिले. प्रदर्शन १३ तारखेपर्यंत भरणार आहे. केंद्रीयमंत्री जयंत सिन्हा,रामदास आठवले भेट देणार आहेत. खासदार, आमदारांकडे विस्तारक म्हणून जबाबदारी आहे. ते आले नाही असे मी म्हणणार नाही. प्रदर्शनादरम्यान ते भेट देतील.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
ब्रिटनमध्ये त्रिशंकू स्थिती​

'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार
जिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय

Web Title: Pune news Narendra Modi government celebration Modi Fest Anil Shirole Pune