

Sanjay Malhotra Warns of Possible Fuel Price Hike
Esakal
Sanjay Malhotra: देशवासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन आवश्यकतेनुसार वापरण्याचा आणि बचतीचा सल्ला दिला आहे. यानंतर देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढण्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले होते. दरम्यान, येत्या काही दिवसात पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. अर्थात सरकारकडून हे दावे फेटाळले जात आहेत. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं की, जर पश्चिम आशियातील युद्ध आणखी काही काळ सुरू राहिलं तर भारतात इंधनाच्या किंमतीत वाढ करावी लागू शकते.