घोषणांचा महापूर, शेतकरी कोरडाच 

डॉ. अजित नवले
शुक्रवार, 26 मे 2017

योजना चांगल्या असल्या तरी त्यासाठी आर्थिक तरतूद न केल्याने शेतकरी त्यांच्या लाभापासून वंचित आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी कार्यवाहीत आणाव्यात... 

 

सरकारने पिकविम्यासाठी नवीन योजना आणली, परंतु ती शेतकऱ्यांपेक्षा खासगी कंपन्यांच्याच फायद्याची ठरली. शेतमाल बाजार सुधारणांसाठी धोरणात्मक निर्णय घेतला गेला, परंतु राज्यस्तरावर त्याची अर्धवटच अंमलबजावणी झाली. योजनांतील अनुदान थेट लाभार्थ्यांना देण्यासाठीचा 'डीबीटी'चा निर्णय स्वागतार्ह आहे. शेतमाल आयात- निर्यातीसंबंधीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पशुधन संरक्षणासाठी नवीन योजना आणली, मात्र त्यासाठीचा निधी अपुरा आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांना प्रचंड फटका सोसावा लागला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दाखवलेले दिवास्वप्न कधी सत्यात उतरते याची प्रतीक्षा आहे. 

'बाहुबली' मोदी सरकारचे वॉलपेपर डाऊनलोड करा

मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांनी वाढले. त्या रोखण्यासाठी ठोस प्रयत्न हवेत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीकरता तरतूद करावी. कृषी सिंचनासाठीच्या घोषणा स्वागतार्ह असल्या तरी त्यासाठी पुरेशा निधी दिल्यासच अपेक्षित परिणाम साधला जाईल. पीकविम्याची योजना सरकारी कंपन्यांच्या माध्यमातूनच राबवावी.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे आश्वासन सरकारने पाळावे. भाव स्थिरीकरण कोष स्थापन करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. ग्रामीण क्षेत्रात अधिक रोजगारनिर्मिती आणि ग्रामस्तरावरील पायाभूत सुविधांचा विकास यावर भर द्यावा. ढिसाळ अंमलबजावणी आणि अपुरी आर्थिक तरतूद यामुळे शेतीविकासाच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यातील त्रुटी दूर कराव्यात. शेतमालाला आधार भावाचे आश्वासन सरकारने पायदळी तुडवले. तुरीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे सोयाबीन, साखर, कांदा, मका, गहू, कडधान्य इत्यादी पिकांचे भाव पडले. सरकारने फक्त ग्राहककेंद्री विचार न करता शेतकऱ्यांच्या हितासाठीही पावले उचलावीत. शेतमालाचे काढणीपश्‍चात होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. 
 

सरकारच्या कामगिरीला दिलेले गुण - 2 
 

(लेखक महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस आहेत)

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:

मोदींचा करिष्मा अजूनही कायम

काळा पैशाला आळा; आता रोजगारनिर्मिती हवी

स्मार्ट सिटी मिशनला गती मिळेना

दिशाभूल करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी

घोषणांचा महापूर, शेतकरी कोरडाच

मोदीसत्ताक!

हायस्पीड रेल्वेला आता द्यावे प्राधान्य

'एफडीआय'ने उद्योगांना चालना

आणखी ताज्या बातम्या वाचा:

सांगलीतील शिराळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय; काँग्रेसचे पानिपत

ह्रतिकच्या हस्ते मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाॅंच

राम मंदिराबाबत भाजपची सबुरीची भूमिका

नाशिकमधील गडकरी चौकात अपघात; तीन ठार

पनवेलमध्ये भाजप, मालेगावात शिवसेना; भिवंडीत काँग्रेस आघाडीवर

विरोधी पक्षाच्या नेत्यांना सोनियांचे मेजवानीचे निमंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ अपघात; तीन ठार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India News Maharashtra News Modi Cabinet Modi Sarkar Narendra Modi BJP Government Sakal esakal Farmers Agriculture