esakal | पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ते कोरोनाबाबत WHO चा इशारा; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Aaj Divasbharat

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यातच पूजाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून तिच्या भावासह मित्राचा जबाब निर्णयाक आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं आहे.

पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ते कोरोनाबाबत WHO चा इशारा; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यातच पूजाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून तिच्या भावासह मित्राचा जबाब निर्णयाक आहे. दरम्यान, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं आहे. राज्यात गुन्हे शाखेनं उघडकीस आणलेल्या पॉर्न व्हिडिओ प्रकरणात आता काही उद्योगपतींचा सबंध असल्याची चर्चा आहे. पुणे सातारा महामार्गाचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काय झालं असं विचारणाऱ्या काँग्रेसकडे 70 वर्षांचा हिशोब मागितला.

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकणावरून शिवसेनेवर भाजपकडून टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता याबाबत मौन सोडलं आहे. वाचा सविस्तर

गुन्हे शाखेने पर्दाफाश केलेल्या पॉर्न व्हिडीओ प्रकरणात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा होत आहे. बड्या उद्योगपतीचाही प्रकरणाशी संबंध - वाचा सविस्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर जोरात हल्लाबोल केला. यात शहा काश्मीर मुद्यावरून काँग्रेसवर भडकले आणि हिशोब कसला मागता असा प्रश्नही केला. वाचा सविस्तर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'हम दो, हमारे दो' वेळी जावयाच्या जमिनीचा उल्लेख केला असता तर...वाचा सविस्तर

कधीही, कोठेही आंदोलन अशक्य; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली. आंदोलनासाठी दीर्घकाळ सार्वजनिक ठिकाणी ठाण मांडून बसता येत नाही, विशिष्ट परिसरामध्ये हे आंदोलन केले जावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. वाचा सविस्तर 

नितीन गडकरी यांनी पुणे सातारा महामार्गाचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल असे आश्‍वासन दिले आहे. पुणे-सातारा हायवेचं काम कोणामुळं रखडलं; नितीन गडकरींचा मोठा खुलासा - वाचा सविस्तर

गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोनाबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा - वाचा सविस्तर

वानवडी येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेल्या टिकटॉक स्टार पुजा चव्हाण हिचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला; भाऊ, मित्राचा जबाब निर्णायक - वाचा सविस्तर

आमिर खानची मुलगी इरा खानने तिचं रिलेशनशिप स्टेटस जाहीर केल्यापासून तिचा बॉयफ्रेंड कोण आहे याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये आहे. कोण आहे आमिरच्या मुलीचा मराठी बॉयफ्रेंड? कशी झाली भेट? वाचा सविस्तर

अभिनेत्री दिशा पटानीपेक्षा तिच्या बहिणीची चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे. दिशाची बहीण दिसते लई भारी; आहे 'रियल लाईफ हिरोइन' वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil